तालुक्यातील पोहेगाव येथील भि. ग. रोहमारे ट्रस्टतर्फे देण्यात येणाऱ्या राज्य पातळीवरील ग्रामीण साहित्य पुरस्कारांची नुकतीच घोषणा करण्यात आली. पुरस्कारप्राप्त लेखकांमध्ये सदानंद सिनगारे (बुलढाणा), प्रदीप पाटील (नांदेड), संजीवनी तडेगावकर (जालना), लक्ष्मण बारहाते (नाशिक), विलास पगार (नाशिक), केशव बसेकर (परभणी) यांचा समावेश आहे.
ट्रस्टचे अध्यक्ष अशोक रोहमारे व उपक्रमाचे कार्यवाह डॉ. गणेश देशमुख यांनी ही माहिती दिली.
ट्रस्टतर्फे १९८९ पासून राज्य पातळीवर ग्रामीण साहित्यातील कवितासंग्रह, कादंबरी, कथासंग्रह व समीक्षा या साहित्य प्रकारातील सवरेत्कृष्ट ग्रंथांना पुरस्कार देण्यात येतात. यावर्षी २०११ या वर्षांतील पुढील ग्रंथांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार विजेते लेखक व त्यांची पुस्तके पुढीलप्रमाणे – सदानंद सिनगारे, खामगाव (मुक्काम पोस्ट खेर्डा), प्रदीप पाटील, कामरसपल्ली (होरपळ), लक्ष्मण बारहाते, एरंडगाव (पाच बिघे), संजीवनी तडेगावकर, जालना (अरूंद दारातून बाहेर पडताना), विलास पगार, नाशिक (पुस्तक समीक्षा), केशव बा. बसेकर, परभणी (गाव शिवार))
या पुरस्काराने आत्तापर्यंत राज्यातील शंभरपेक्षा अधिक ग्रामीण लेखकांना सन्मानित करण्यात आले आहे. कोपरगावचे माजी आमदार (स्व) के. बी. रोहमारे यांच्या पंधराव्या स्मृतिदिनी येत्या दि. ७ ला प्रसिद्ध ग्रामीण कवी जयराम खेडेकर यांच्या हस्ते व माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात होणार आहे.    

kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी