News Flash

उत्तराखंडमध्ये सेवा केलेल्या आरटीओ अधिकाऱ्याचा सन्मान

उत्तराखंडमधील जलप्रलयामुळे नागरिक जागोजागी अडकून पडले होते. या नागरिकांच्या बचावासाठी उत्कृष्ट सेवा कार्य केलेल्या कल्याणमधील

| July 24, 2013 08:03 am

उत्तराखंडमधील जलप्रलयामुळे नागरिक जागोजागी अडकून पडले होते. या नागरिकांच्या बचावासाठी उत्कृष्ट सेवा कार्य केलेल्या कल्याणमधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षक डॉ. विजय शेळके यांचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
एका छोटेखानी समारंभात आयोजित कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, पुनवर्सनमंत्री पतंगराव कदम, राज्यमंत्री सुरेश धस, मुख्य सचिव जयंतकुमार बाठिया उपस्थित होते. जलप्रलयामुळे उत्तराखंडमध्ये भाविक जागोजागी अडकून पडले होते. गावच्या गावे उद्ध्वस्त झाली आहेत. या बेघरांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे एक आपत्कालीन पथक उत्तराखंडमध्ये पाठविण्यात आले होते. या पथकात कल्याण उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी डॉ. विजय शेळके यांचा सहभाग होता. या कार्यक्रमाला कल्याणचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक गुजराथी, मोटार वाहन निरीक्षक वैजनाथ तांबडे उपस्थित होते. केदारनाथ, गुप्तकाशी, रुद्रप्रयाग, जोशीमठ, हरिद्वार या ठिकाणी विविध भागांतील भाविक अडकून पडले होते. त्यांना धीर देऊन तेथून परतीच्या ठिकाणी पोहचविणे खूप अवघड काम होते. नागरिक भेदरलेले होते. इतर भाविकांबरोबर महाराष्ट्रातील भाविकांना अडकलेल्या ठिकाणाहून डेहराडून येथे आणून सोडण्याचे काम सलग दहा दिवस आम्ही उत्तराखंडमध्ये केले, असे यावेळी शेळके यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 24, 2013 8:03 am

Web Title: rto officer served in uttarakhand felicitate in kalyan
Next Stories
1 शंभर विद्यार्थी आठवीच्या प्रवेशापासून वंचित
2 हिरव्या मसाल्याच्या वाटमारीला महागाईची फोडणी
3 ठाणे, कळव्यात कचऱ्याचे ढीग
Just Now!
X