तामिळनाडू, आंध्र प्रदेश व महाराष्ट्राला जोडणारी बहुचíचत चेन्नई-नगरसोल एक्स्प्रेस या गाडीला अखेर हिरवा कंदील मिळाला. दोन मार्चपासून ही गाडी रुळावर धावणार असल्याची माहिती मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेचे अरुण मेघराज यांनी दिली. या गाडीमुळे तिरुपतीला जाणाऱ्यांची सोय झाली आहे.
गेल्या रेल्वे अर्थसंकल्पात घोषित झालेल्या या एक्स्प्रेसला रुळावर येण्यास एक वर्षांचा कालावधी लागला. राजकीय व तांत्रिक अडसर दूर झाल्याने आता ही गाडी प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. आठवडय़ातून एक वेळा धावणारी चेन्नई-नगरसोल (१६००३) एक्स्प्रेस दर रविवारी चेन्नईहून सकाळी सव्वानऊ वाजता निघेल व दुसऱ्या दिवशी सोमवारी पहाटे ५.१०ला नांदेड, परभणीत ६३.० वाजता, जालना ८.१५ औरंगाबाद ९.२५ वाजता व (दि. ३) दुपारी १२ वाजता नगरसोल येथे पोहोचेल.  दर सोमवारी दुपारी दीड वाजता ही एक्स्प्रेस (१६००४) नगरसोलहून चेन्नईसाठी रवाना होईल. परभणीत सायंकाळी ५.४०ला येऊन पुढे चेन्नईकडे मार्गस्थ होईल. मंगळवारी दुपारी दीड वाजता तिरूपती तर ४.३० वाजता चेन्नईत पोहोचणार आहे. एकूण १७ डब्यांची ही गाडी असून दोन एसी, अकरा स्लिपर कोचसह चार सामान्य डबे जोडण्यात आले आहेत. तामिळनाडूला जोडणारी चेन्नई-नगरसोल पहिली गाडी आहे. तसेच या गाडीमुळे मराठवाडय़ातील प्रवाशांना तिरुपतीला जाणे आणखी सुकर झाले आहे.