25 February 2021

News Flash

जमावाकडून ग्रामीण रुग्णालयाची तोडफोड; आरोग्य कर्मचाऱ्यांचे आज कामबंद आंदोलन

अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. त्या मुलाला कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. दरम्यान जमावाने रुग्णालयातील वाहनाच्या काचा फोडल्या, रुग्णालयातील साहित्याची तोडफोड, या घटनेचा निषेध

| June 24, 2013 01:56 am

हिंगोली-नांदेड रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये एका मुलाचा मृत्यू झाला. त्या मुलाला कळमनुरीच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. दरम्यान जमावाने रुग्णालयातील वाहनाच्या काचा फोडल्या, रुग्णालयातील साहित्याची तोडफोड, पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण केली. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कळमनुरी नगर परिषदेचे उपाध्यक्ष म. खाजा बागवान यांचा मुलगा म. ताहेर याला हिंगोली-नांदेड रस्त्यावर कळमनुरी येथे मालमोटार (एमएच २६-५९७४) ची धडक बसल्याने त्याचा मृत्यू झाला. ग्रामीण रुग्णालयात घेऊन गेलेल्या जमावाने डॉक्टर एम. जी. मुपकलवार यांच्या (एमएच ३८-३९३८) वाहनाच्या काचा फोडल्या, रुग्णालयातील साहित्याची तोडफोड केली. दरम्यान जमावाने केलेल्या दगडफेकीत पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग गवते, विनायक लांबे जखमी झाले. निष्काळजीपणे मालमोटार चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाखाली शुकूर बागवान यांच्या तक्रारीवरून कळमनुरी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
रुग्णालयातील घटनेच्या निषेधार्थ कळमनुरी ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी सोमवारी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. कळमनुरीच्या तहसीलदारांना दिलेल्या लेखी निवेदनात रुग्णालयातील तोडफोड, वाहनांचे नुकसान केले तसेच परिचारिकेच्या अंगावर धावून गेल्याने त्या घाबरून गेल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात दोषींवर कारवाईची मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2013 1:56 am

Web Title: rural hospital to damage from crowd todays no work
Next Stories
1 प्राचीन महाराष्ट्र परंपरा आणि समृद्धी’ पुस्तकाचे प्रकाशन
2 परीक्षांवरील बहिष्कार काळातील प्राध्यापकांना वेतन देणार नाहीच!
3 मागासवर्गीय विद्यार्थ्यांऐवजी शिष्यवृत्तीचा फायदा बँकांना !
Just Now!
X