News Flash

वाई अर्बन बँकेच्या सरव्यवस्थापकपदी दीक्षित

वाई अर्बन बँकेच्या सरव्यवस्थापकपदी सदानंद दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ शाखांच्या सहाय्याने ८०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या बँकेत लवकरच कोअर बँकींग, एसएमएस,

| January 30, 2013 09:31 am

वाई अर्बन बँकेच्या सरव्यवस्थापकपदी सदानंद दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १८ शाखांच्या सहाय्याने ८०० कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या या बँकेत लवकरच कोअर बँकींग, एसएमएस, एटीएम सुविधांचा लाभ देण्यात येणार आहे. नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरात शाखा विस्तार करण्याचा बँकेचा मानस आहे. सदानंद दीक्षित यांना ३२ वर्षांचा बँकींग क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव असून त्यांनी विद्या सहकारी बँकेत विविध पदांवर काम केले आहे. पदभार स्वीकारताना त्यांनी, ग्राहकांना आधुनिक व ग्राहकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न करू, तसेच ग्राहकांच्या विविध गरजा विचारात घेऊन योजना कार्यान्वित केल्या जातील अशी ग्वाही दिली.
 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 30, 2013 9:31 am

Web Title: sadanad dixit elected as a general manager for wai urban bank
Next Stories
1 राज्यस्तरीय गायन स्पर्धा
2 आमदार उंडाळकरांचे पुत्र उदयसिंह पै. संजय पाटील खून प्रकरणी अटकेत
3 इचलकरंजीतील बेशिस्त वाहतुकीस नगरपालिकेचे दुर्लक्ष कारणीभूत- जाधव
Just Now!
X