News Flash

‘यो -यो’ वर थिरकणार!

पण, यावेळी मित्राच्या नव्हे तर मैत्रीण अश्विनी यार्दीच्या सांगण्यावरून थेट ‘यो-यो’च्या गाण्यावर सलमान आणि अक्षय एकत्र थिरकणार आहेत.

| February 26, 2014 01:07 am

सलमान खान आणि अक्षय कुमार ही जोडगोळी एकत्र आली होती ती ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात. त्यानंतर शिरीष कुंदेरच्या ‘जानेमन’मध्ये. आणि मग फराह खानच्या ‘तीस मार खाँ’मध्ये एका गाण्यापुरता सलमानने अक्षयबरोबर ताल धरला होता. आता मित्रांसाठी काहीही करण्यात बॉलिवूडचा एकच ‘बीइंग ह्युमन’ भाई प्रसिध्द आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सलमानने अक्षयबरोबर ताल से ताल मिला. करायला होकार दिला आहे. पण, यावेळी मित्राच्या नव्हे तर मैत्रीण अश्विनी यार्दीच्या सांगण्यावरून थेट ‘यो-यो’च्या गाण्यावर सलमान आणि अक्षय एकत्र थिरकणार आहेत.
अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दीच्या ‘ग्रेझिंग गोट प्रॉडक्शन’ या बॅनरखाली ‘फुगले’ चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटात कुठेही अक्षय कुमारची भूमिका नाही. ऑलिम्पिक विजेता बॉक्सर विजेंदर सिंग, मोहित मारवा, कियरा अडवाणी आणि अरिफ लाम्बा हे चार नवीन चेहरे या चित्रपटात आहेत. अर्थात, निर्मितीच अक्षयची असल्याने या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी म्हणून त्याने यो-यो हनी सिंग या सध्या लोकप्रिय असलेल्या गायकाला पाचारण केले.
आता हनी सिंगच्या गाण्यावर अक्षय एकटाच यो यो करत काय नाचणार? म्हणजे यो यो स्वत: त्याच्या प्रत्येक गाण्यात नाचत असला तरीही. पण, मग म्हणे अश्विनीने सलमानला विनंती केली. आणि आपल्या मैत्रिणीला सलमानने लगेच होकारही दिला.
सलमान आणि अक्षयमध्ये याआधी कुठले भांडण नव्हतेच. उलट आपल्या काळातील कलाकारांमध्ये आपली कारकीर्द व्यवस्थित सांभाळणारा कलाकार म्हणून अक्षयचे आपल्याला कौतुकच वाटत आले असल्याचे सलमानने म्हटले आहे. शिवाय, ‘मुझसे शादी करोगी’मध्ये या दोघांची जोडी लोकांना आवडली होती.
त्यानंतर आलेला ‘जानेमन’  फारसा यशस्वी ठरला नाही.  पण, तरीही ते दोघेही नृत्यासाठी प्रसिध्द आहेत आणि त्यांना नाचण्यासाठी गाणेही हनी सिंगचे आहे. शिवाय, हनी सिंगला मोठं करण्यात शाहरूखचाही मोलाचा वाटा असल्याने सलमान त्याच्या गाण्यावर नाचणार किंबहुना हनी सिंगने शाहरूखला यो यो करत सलमानसाठी गाणे म्हटले याचीही चर्चा होणारच.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2014 1:07 am

Web Title: salman and akshay to dance together on a yo yo honey singh song
Next Stories
1 राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे शानदार सोहळ्यात वितरण
2 कायमस्वरूपी निदान करणाऱ्या आयुर्वेदाकडे वळावे – डॉ. रहाणे
3 भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या खासदार निधीची गाठ सुटेना..
Just Now!
X