17 December 2017

News Flash

६ ते १० फेब्रुवारी दरम्यान ‘सामथ्र्य-२०१३’

मदतीसाठी आवाहन राष्ट्रीय दृष्टीहिन संघ, महाराष्ट्र या संस्थेतर्फे ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान श्रीमती जानकीबाई

प्रतिनिधी | Updated: December 27, 2012 12:07 PM

मदतीसाठी आवाहन
राष्ट्रीय दृष्टीहिन संघ, महाराष्ट्र या संस्थेतर्फे ६ ते १० फेब्रुवारी दरम्यान श्रीमती जानकीबाई सभागृह, अंधेरी रिक्रेएशनल क्लब, भवन्स महाविद्यालयाजवळ, अंधेरी येथे ‘सामथ्र्य-२०१३’ या अंध कल्याण व शैक्षणिक सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. अंधांना सन्मानाने आणि प्रतिष्ठापूर्वक जगता यावे, त्यांच्या मूलभूत अधिकारांचे संरक्षण व्हावे आणि त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढा देण्यासाठी या संस्थेने सामाजिक चळवळ उभी केली आहे. या चळवळीचा एक भाग म्हणून आयोजित करण्यात येत असलेल्या ‘सामथ्र्य’ या सप्ताहाचे हे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. या सप्ताहात महाराष्ट्रातील सर्व अंध शाळा व सर्व शिक्षा अभियानातून शिकणारे किमान ६०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. यावेळी ब्रेल वाचन (हिंदी, मराठी, इंग्रजी), निबंध लेखन, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व, सुगमसंगीत गायन, वादन, डबल विकेट क्रिकेट व बुद्धीबळ आदी स्पर्धाचे आयोजनही करण्यात आले आहे. या सप्ताहात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्या निवास व भोजनाची व्यवस्था संघातर्फे केली जाते. त्यासाठी सुमारे १५,९०,००० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. मात्र एवढा खर्च पेलणे संघाला शक्य नसल्याने दानशूर व्यक्ती, उद्योग समूह, आर्थिक संस्थांनी यांनी मदतीचा हात पुढे करावा, असे आवाहन संघातर्फे करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९८२०६८१०३२ वर संपर्क साधावा.

First Published on December 27, 2012 12:07 pm

Web Title: samarthy 2013 is between 6th to 10th february