News Flash

समीर देशमुखांनी गडकरींशी संधान साधल्याने राजकीय वर्तुळाला धक्का

जिल्हा बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी अडचणीत सापडल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्याशी साधलेले संधान राजकीय वर्तुळास धक्का देणारे तर विदर्भातील सहकार वर्तुळास अचंब्यात

| February 14, 2014 07:23 am

जिल्हा बँकेचे अध्यक्ष समीर देशमुख यांनी अडचणीत सापडल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांच्याशी साधलेले संधान राजकीय वर्तुळास धक्का देणारे तर विदर्भातील सहकार वर्तुळास अचंब्यात टाकणारे ठरले आहे.
प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष असलेले समीर देशमुख हे जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही सांभाळतात. अपक्ष निवडून येत राकाँचे सहयोगी आमदार झालेले त्यांचे वडील प्रा. सुरेश देशमुख यांना पवार निष्ठेतून विदर्भ सिंचन मंडळाच्या उपाध्यक्षपदाचा लाल दिवा पूर्वीच बहाल करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळापासून काँॅग्रेसची नाळ जुळलेल्या देशमुख घराण्याने चव्हाण-पवार यांचीच निष्ठा शिरोधार्य मानली. मात्र, तिसऱ्या पिढीतील नेते असलेल्या समीर देशमुखांनी भाजपशी संगत करण्याचा निर्णय घेत संपूर्ण राजकीय आडाखे मोडीत काढल्याचे म्हटले जाते. नितीन गडकरींशी संधान साधणाऱ्या समीर देशमुखांच्या भेटीचे वृत्त गुरुवारी ‘लोकसत्ता’तून प्रकाशित होताच विदर्भभरातील सहकार नेत्यांनी देशमुख गटाकडे याविषयी विचारणा केली. शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या विदर्भभरातील नेत्यांनी भाजपची वाट आजवर पकडलेली नाही. बुलढाण्याचे शिंगणे, अकोल्याचे कोरपे, नागपूरचे केदार, गडचिरोलीचे पोरेड्डीवार, यवतमाळचे पाटील व अन्य सहकारनिष्ठ राजकीय कुटुंबांनी एकवेळ काँग्रेसला पत्करल, पण भाजपचे उंबरठे गाठले नाही.     
या पाश्र्वभूमीवर समीर देशमुखांनी टाकलेला डाव सहकार वर्तुळास अचंबित करणारा ठरला आहे. जिल्ह्य़ांतर्गत राजकीय कोंडी झाल्यावर तटस्थ राहून काँॅग्रेसला जेरीस आणण्याचा मार्ग बऱ्याच सहकार नेत्यांनी पत्करला आहे. निवडणुकीचे मैदान तर अद्दल घडविण्याची अशी एक नामी संधी समजली जाते, पण तसे न करता भाजपच्या सहाय्याने राजकीय आयुष्याला उभारी देण्याचा प्रयत्न म्हणजे आत्महत्याच ठरू शकते, अशी प्रतिक्रिया नागपूरच्या एका नेत्याने यासंदर्भात व्यक्त केली.
जिल्ह्य़ातील आमदार देशमुख यांच्या नेतृत्वातील सहकार गट सध्या कोंडीत सापडल्याचा अनुभव घेत आहे. जिल्हा बँॅक, सूतगिरणी, अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्यावर पसरलेली सावली व त्याचा फोयदा घेण्यास टपून बसलेले विरोधक अशी ही कोंडी आहे.
जिल्हा बँकेबाबत स्पष्ट भूमिका घेऊनही पहिले मुख्यमंत्री चव्हाण व नंतर उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडून निराशाजनक अनुभव घेणाऱ्या सहकार गटासाठी हा काळ जीवनमरणाचा ठरल्याचे म्हटल्ेा जाते. त्यातच खासदार दत्ता मेघे गटाचे व्यूह सुध्दा अडचणीचे ठरू लागले आहे. निवडणुकीवेळी मदत घेणाऱ्या मेघेंनी नंतर मात्र कबूल करूनही खासदार निधीचा हिस्सा सहकार गटाच्या विकासकामांना दिला नाही. शासकीय समित्यांवरील गटाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. मेघे वैद्यकीय महाविद्यालय उभारताना सहकार गटाने जिल्हा बंॅकेच्या माध्यमातून केलेली भरीव मदत आता सहकार गटाला गरज असताना विसरली जात आहे.
या अनुषंगाने देशमुख गट काँॅग्रेसवर की मेघे गटावर रूष्ट आहे की हा एक दबाबतंत्राचा भाग आहे, याविषयी चर्वितचर्वण होत आहे. भाजपशी संधान असल्याच्या चर्चेतून काँग्रेसवर दबाब आणण्याचे पवार तंत्र तर सहकारगटाने स्वीकारले नाही ना, अशीही राजकीय वर्तुळातील शंका आहे. दुसरीकडे जिल्ह्य़ात एकेकाळी गावोगावी कार्यकर्त्यांचे जाळे असणाऱ्या सहकार गटावर मेघे-कांबळे गटाने प्रलोभनांचा मारा करीत कार्यकर्ते पळविले. या कार्यकर्त्यांना कांबळेंच्या सत्ताशक्तीचा व मेघेंच्या धनशक्तीचा दबाव झुकारणे दिवसेंदिवस कठीण होत चालले आहे.
ही पळवापळवी थांबविण्यासाठी सहकारगटाकडून मोठा राजकीय निर्णय अपेक्षिल्या जातो, पण हे सर्व करताना शरद पवार-अजित पवार यांचा कौल ते घेणार काय? लाल दिव्याच्या गाडीवर पाणी सोडतील काय? सहकारी संस्थांवर परत पाचर मारून घेणार काय? असे प्रष्टद्धr(२२४)्ना उपस्थित केल्या जाऊ लागले आहेत. झालेल्या भेटीत नितीन गडकरींनी विचारपूर्वक निर्णय घेण्याचा दिलेला वडीलकीचा सल्ला आता समीर देशमुखांना विचारात पाडणारा ठरू शकतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 7:23 am

Web Title: sameer deshmukh gadkari nexus shocks political circle
टॅग : Gadkari
Next Stories
1 वाहतूक नियमांची माहिती शाळास्तरावर देण्याची गरज
2 राष्ट्रीय कृषी वसंत प्रदर्शनात औषध वनस्पतींचे सादरीकरण
3 ‘व्हॅलेंटाईन’ऐवजी ‘मातृपितृ पूजन’दिन साजरा करा
Just Now!
X