27 November 2020

News Flash

संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालनाचा एमटीडीसीच्या यादीत समावेश करण्यासाठी मनसेचा पुढाकार

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची पुढच्या पिढय़ांना माहिती मिळावी आणि त्यापासून त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शिवसेनेने आग्रहाने शिवाजी पार्कजवळ ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन’ उभारले.

| January 10, 2015 06:48 am

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची पुढच्या पिढय़ांना माहिती मिळावी आणि त्यापासून त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून शिवसेनेने आग्रहाने शिवाजी पार्कजवळ ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन’ उभारले. पण दालनाचा प्रचार-प्रसार करण्यात शिवसेना अपयशी ठरल्याने फारसे कुणी तिकडे फिरकत नाही. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत त्याचा समावेश नसल्याने पर्यटकही तेथे जात नाहीत. त्यामुळे महामंडळाच्या यादीत संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालनाचा समावेश व्हावा यासाठी मनसेने पुढाकार घेतला आहे.
संयुक्त महाराष्ट्र चळवळींच्या स्मृती जागृत राहाव्यात म्हणून शिवसेनेने आग्रहाने पालिकेच्या माध्यमातून शिवाजी पार्क येथे ‘संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालन’ उभारले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते ३० एप्रिल २०१० रोजी या दालनाचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या दालनाचे फारशा मुंबईकरांना दर्शन घडलेले नाही. तसेच देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांनाही हे दालन दाखविण्यात येत नव्हते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीमध्ये या दालनाचा समावेश करण्यात न आल्यामुळे त्याची माहितीच पर्यटकांना मिळत नाही. त्यामुळे पर्यटक तेथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीत. शिवसेनेनेही त्यासाठी प्रयत्न केले नाहीत.
राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत समावेश असलेल्या पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटक आवर्जून जातात. परंतु या दालनाचा महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत समावेश नसल्याने पर्यटक तेथे पोहोचू शकले नाहीत. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या स्मृतींचे दर्शन पर्यटक आणि मुंबईकरांना घडावे यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत या दालनाचा समावेश करण्यात यावा, अशा ठरावाची सूचना मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांनी पालिका सभागृहात मांडली होती. ही ठरावाची सूचना एकमताने मंजूर झाली असून आता हे दालन महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी मदत होणार आहे. हा प्रस्ताव पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पाठविण्यात आला असून त्यांच्या निर्णयाअंती हे दालन महामंडळाच्या यादीत समाविष्ट होऊ शकेल. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या ‘महाभ्रमण योजनेत’ संयुक्त महाराष्ट्र स्मृतिदालनाचा समावेश करावा, अशी मागणी करणारे पत्र सुधीर जाधव यांनी महामंडळाच्या महाव्यवस्थापक किशोरी गद्रे यांना पाठविले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2015 6:48 am

Web Title: samyukta maharashtra movement
टॅग Mns
Next Stories
1 ट्रकखाली चिरडल्याने मुलाचा मृत्यू मृतदेह लपविण्याचा प्रयत्न
2 अभिनेत्रीवर बलात्कार करणाऱ्या निर्मात्यास अटक
3 ८० लाख रुपयांचे एमडी जप्त
Just Now!
X