News Flash

आमगाव तालुक्यात पोवारीटोला घाटावरील वाळूचा साठा जप्त

आमगाव तालुक्यात पोवारीटोला वाघनदी घाटावर वाळूमाफीयांनी अवैधपणे नदी पात्रातील वाळूची चोरी करून तब्बल ३ हजार ब्रास वाळू अवैधपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात साठा करून ठेवली होती.

| March 14, 2013 03:16 am

आमगाव तालुक्यात पोवारीटोला वाघनदी घाटावर वाळूमाफीयांनी अवैधपणे नदी पात्रातील वाळूची चोरी करून तब्बल ३ हजार ब्रास वाळू अवैधपणे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात साठा करून ठेवली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत वाळू चोरीचा पर्दाफाश केला.
आमगाव येथे प्रशासनातील अधिकारी व वाळूमाफीयांच्या संगनमताने शासनाचा कोटय़वधीचा महसूल बुडत असल्याची तक्रारी शासन दरबारी असताना आज गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी ही कारवाई केली. आमगाव येथून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या पोवारीटोला येथील नदी घाटावरून तीन हजार ब्रास वाळू चोरी करून वाळू माफीयांनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात साठा करून ठेवली होती. या ठिकाणी कारवाई करीत ती वाळू जप्त करण्यात आली. वाळूमाफीयांनी तीन हजार ब्रास वाळू गावातील शेतकरी पवन सीतकन ब्राह्मणकर, भरत लिखन रहांगडाले व हेतराम खुनिराम येडे यांच्या शेतात ठेवली होती; परंतु अवैधपणे साठा करून ठेवलेल्या वाळूचा साठा विक्री करण्याअगोदरच पोलिसांनी तो साठा हस्तगत केला. याप्रकरणी वाळूमाफीयांचे अटकसत्र पोलीस कारवाईनंतर सुरू होणार असे संकेत मिळाले. यावेळी पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे व सहकारी पोलीस कर्मचारी, नायब तहसीलदार वि.एस. मेश्राम, मंडळ अधिकारी एस.एल. मेश्राम, तलाठी आर.एस. ब्राह्मणकर घटनास्थळावर उपस्थित होते. या प्रकरणात तालुक्यातील वाळूमाफीयांनी यापूर्वीही अनेक नदी घाटावरून वाळूची अवैध उचल केली व शासनाला लाखोंचा फटका बसला; परंतु या सकारात्मक कारवाईने वाळूमाफीया व प्रशासनातील अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 3:16 am

Web Title: sand impound in amgaon distrect
Next Stories
1 ‘अल्ट्राटेक’ विरोधात नांदाफाटात उपोषण सुरूच
2 चंद्रपुरात जिल्हा सांस्कृतिक महोत्सव व ग्रंथोत्सव २२ मार्चपासून
3 बुलढाणा जिल्ह्य़ात पेटणार भीषण पाणीयुध्द
Just Now!
X