News Flash

महसूल पथकाच्या मारहाणीत वाळू वाहतूकदार ठार

जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या वाळूतस्करी विरोधातील पथकाने केलेल्या बेदम मारहाणीत तालुक्यातील देसवडे येथे मुळा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही

| March 14, 2013 08:35 am

जिल्हाधिकाऱ्यांनी नियुक्त केलेल्या वाळूतस्करी विरोधातील पथकाने केलेल्या बेदम मारहाणीत तालुक्यातील देसवडे येथे मुळा नदीपात्रात वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. महसूलच्या पथकातील तिघे व दोन पोलीस अशा पाच जणांवर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाल्याने जिल्ह्य़ात खळबळ उडाली आहे.
महसूलच्या पथकाने केलेल्या बेदम मारहाणीत जांबूत (तालुका संगमनेर) रेवजी भाऊ मेंगाळ हा अदिवासी ट्रॅक्टरचालक ठार झाला. तो वाळूचा वाहतूकदार होता. काल (बुधवार) रात्री या नदीपात्रात गेलेल्या महसूलच्या पथकाशी झालेल्या बाचाबाचीचे पर्यावसन मारहाणीत होऊन त्यातच मेंगाळ याचे निधन झाले.   
दरम्यान, पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात दिरंगाई झाल्याच्या निषेधार्थ पोलीस उपाधीक्षक शाम घुगे यांच्यासह राज्य राखीव पोलीस दलाच्या दोन वाहनांचे संतप्त ग्रामस्थांनी मोठे नुकसान केले.  येथे मुळा नदीपात्रातील वातावरण आज सकाळपासून तणावपूर्ण असून तेथे सशस्त्र पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जांबूत येथील ग्रामस्थांच्या प्रक्षोभामुळे मंडलाधिकारी पठाण, तलाठी मोराळे व केतकर यांच्यासह सहायक फौजदार जाधव, पोलीस कॉन्स्टेबल बढे यांच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. उपाधीक्षक घुगे यांना घेराव घातल्यामुळे त्यांनी महसूल तसेच पोलीस प्रशासनाच्या वरिष्ठांशी संपर्क साधल्यानंतर काल (बुधवार) रात्री महसूल खात्याचे पथक नदीपात्रात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पथकातील पाचही कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केल्यानंतरच जमाव शांत झाला. नगर जिल्ह्य़ातील पारनेर व संगमनेर तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहणाऱ्या मुळा नदीपात्रात ही घटना घडली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 14, 2013 8:35 am

Web Title: sand transporter killed beating by revenue staff
टॅग : Killed
Next Stories
1 जलसंधारण नसल्यानेच मराठवाडा तहानलेला
2 विद्यापीठ उपकेंद्र वर्षभरात मार्गी लागेल- कुलगुरू
3 पुणे विद्यापीठाच्या कारभारावर गंभीर आक्षेप
Just Now!
X