News Flash

दाजीकाकांच्या निधनाने सांगली, कोल्हापुरात हळहळ

सुवर्णकार दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने अडचणींच्या काळी मार्गदर्शनासाठी धावून येणाऱ्या पितृतुल्य मार्गदर्शकास कोल्हापूर, सांगलीचे सुवर्णकार मुकले आहेत, अशा शब्दांत शुक्रवारी सराफांनी दाजीकाकांविषयीच्या आपल्या भावना

| January 11, 2014 03:12 am

  सुवर्णकार दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाने अडचणींच्या काळी मार्गदर्शनासाठी धावून येणाऱ्या पितृतुल्य मार्गदर्शकास कोल्हापूर, सांगलीचे सुवर्णकार मुकले आहेत, अशा शब्दांत शुक्रवारी सराफांनी दाजीकाकांविषयीच्या आपल्या भावना व्यक्त केल्या. कोल्हापूर सराफ व्यापारी संघटनेच्या वतीने दाजीकाका गाडगीळ यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.     
दाजीकाका गाडगीळ यांच्या निधनाचे वृत्त कळताच येथील गुजरी पेठेत हळहळ व्यक्त करण्यात आली. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची बैठक अध्यक्ष रणजित परमार यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यामध्ये श्रद्धांजली वाहण्यात आली. संघटनेचे उपाध्यक्ष संजय खंबे, सचिव रामचंद्र संकपाळ, सुरेश ओसवाल, शिवराज पवार, राजेश राठोड, हिंदुराव शेळके, दीपक साळोखे, सुरेश गायकवाड-पतौडी आदींसह शहरातील सुवर्णकार उपस्थित होते.     
अध्यक्ष परमार यांनी दाजीकाकांच्या कार्याचा आढावा घेतानाच गेल्या पंचवीस वर्षांतील उभयतांतील संबंधांना उजाळा दिला. ते म्हणाले, महाराष्ट्र राज्य सराफ महासंघाची स्थापना करण्यात दाजीकाका व भीमराव गुंदेशा या दोघांनी पुढाकार घेतला होता. सराफांचे अनेक प्रश्न मार्गी लावण्यात ते सातत्याने आघाडीवर होते. कोल्हापुरातील सराफांच्या समस्या त्यांना कथन केल्या तेव्हा त्यांनी त्यावर अचूक मार्ग सुचवला होता. त्यांच्या निधनाने सुवर्णकारांचे महाराष्ट्रातील एक जाणकार नेतृत्व पडद्याआड गेले आहे. कोल्हापुरातील सराफांचा आधारवड नाहीसा झाला आहे.
दरम्यान सांगली शहरातील सराफांनीही दाजीकाकांना श्रद्धांजली वाहिली. सांगली शहराशी असलेल्या त्यांचे अतुट नातेसंबंधांच्या आठवणी अनेक सराफांनी जागवल्या.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 3:12 am

Web Title: sangli kolhapur shocked dajikakas demise
टॅग : Kolhapur,Sangli
Next Stories
1 अधिका-यांच्या माफीनंतर प्रशासन, पदाधिकारी वाद संपुष्टात
2 ‘बॉयफ्रेंड’ विकृतीपासून दूर रहा- नीला सत्यनारायण
3 निर्मलग्रामच्या ‘गुडमॉर्निग पथका’ला राष्ट्रवादी युवक अध्यक्षानेच पिटाळले
Just Now!
X