03 June 2020

News Flash

संग्रामनगर पुलाचे उद्घाटन उरकले!

शहरातील बहुचर्चित संग्रामनगर उड्डाणपुल दोन उद्घाटनांमुळे राजकीय वादात सापडला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) उद्घाटनाची तयारी सुरू असतानाच सोमवारी शिवसेनेने घाईघाईत

| January 28, 2014 01:45 am

शहरातील बहुचर्चित संग्रामनगर उड्डाणपुल दोन उद्घाटनांमुळे राजकीय वादात सापडला आहे. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्या (मंगळवारी) उद्घाटनाची तयारी सुरू असतानाच सोमवारी शिवसेनेने घाईघाईत या पुलाचे उद्घाटन उरकून टाकले. या निमित्ताने शिवसेनेने राष्ट्रवादीवर कुरघोडी केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
उड्डाणपुलास शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे, अशी मागणी करीत खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, महापौर कला ओझा, आमदार संजय शिरसाट, नगरसेवक राजू वैद्य, भाजपचे अतुल सावे व भागवत कराड यांच्यासह शिवसैनिकांनी मोठय़ा संख्येने सकाळीच पुलाजवळ धडक मारली. या वेळी पुलावर जाण्यास प्रतिबंध करण्यासाठी लावलेले अडथळे दूर करून घोषणाबाजी व हाती भगवे झेंडे घेत पुलावर दुचाक्यांसह प्रवेश केला. शिवसैनिकांच्या आक्रमक पवित्र्याने पोलिसांचीही धावपळ झाली. सुमारे तास-दीड तास हे आंदोलन चालले.
राष्ट्रवादीचे आमदार सतीश चव्हाण यांच्या घरी आयोजित विवाह सोहळ्यानिमित्त केंद्रीय कृषिमंत्री पवार उद्या शहरात येत आहेत. याचे औचित्य साधून पवारांच्या हस्ते पुलाचे उद्घाटन करण्याचे जाहीर झाले होते. आमदार चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांचे या दृष्टीने प्रयत्न सुरू होते. मात्र, शिवसेनेने एक दिवस आधीच उद्घाटन करून राष्ट्रवादीला उघड आव्हान दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 28, 2014 1:45 am

Web Title: sangram nagar bridge inauguration by shiv sena
Next Stories
1 प्रजासत्ताकदिनानिमित्त ध्वजवंदनाचा कार्यक्रम उत्साहात
2 हैदराबाद बँकेच्या शाखेत साडेअकरा लाखांची लूट
3 वृत्तपत्र वितरक सक्षम होणे गरजेचे- डॉ. वाघमारे
Just Now!
X