डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि एनसीसी (एअरविंग)ची कॅडेट सानिका कामत हिची राजधानीतील प्रजासत्ताक पथसंचलनासाठी निवड झाली आहे. बीएसस्सी प्रथम वर्षांला असलेली सानिकाला परेडनंतर दिल्या जाणाऱ्या कॅडेट पुरस्कारासाठी तिचे नामांकन झाले आहे. परेडनंतर ती महाराष्ट्रातील सांस्कृतिक वारसा या कार्यक्रमात सहभागी होणार आहे.
देशभरातील १४४ कॅटेडमध्ये सानिकांचा समावेश करण्यात आला असून यात एअरविंगमधील १२ मुली आहेत. सानिका दोन महिन्याहून अधिक काळ निरनिराळ्या कॅम्पमध्ये सहभागी झाली
आहे.
फिजिकल फिटनेस, शूटिंग यात प्रभावी कामगिरी केल्यामुळे तिची आर डी परेडच्या पथकात निवड झाली आहे. सानिकाचे दिल्लीतील पथसंचलनात सहभागी होण्याचे स्वप्न असताना ते पूर्ण झाले आहे. सानिका उत्कृष्ट खेळाडू आहे. वायुदलातील अधिकारी होणे हे तिचे स्वप्न आहे. सानिकाने तिच्या यशाचे श्रेय एनसीसी एअरविंगचे कमांडिग ऑफिसर एम.एस. चौधरी आणि आई आसावरी कामत यांना दिले आहे.