29 September 2020

News Flash

संत तुकाराम वनग्राम योजना गुंडेगाव समितीला पहिले पारितोषिक

संत तुकाराम वनग्राम योजनेत गुंडेगावच्या (धावडेवाडी, ता. नगर) वन व्यवस्थापन समितीने सवरेत्कृष्ट काम करुन, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.

| February 14, 2014 01:26 am

संत तुकाराम वनग्राम योजनेत गुंडेगावच्या (धावडेवाडी, ता. नगर) वन व्यवस्थापन समितीने सवरेत्कृष्ट काम करुन, जिल्हास्तरीय स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे ५१ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले.  द्वितीय क्रमांक रणखांब (३१ हजार रु. ता. संगमनेर) व तृतीय क्रमांक पोखरी बाळेश्वर (११ हजार रु. ता. संगमनेर) यांनी मिळवला.
प्रथम क्रमांक मिळवलेल्या गुंडेगावची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शिफारस करण्यात आली आहे. सन २०१३-१४ साठीच्या जिल्हा पुरस्कार निवडीसाठी नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीची सभा झाली. यावेळी आदर्शगाव योजेनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार, वॉटरशेड संस्थेचे व्यवस्थापक हरिष डावरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधीक्षक, सामाजिक वनीकरणचे उपसंचालक, जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय वनाधिकारी आदी उपस्थित होते.
उपविभागीय स्तरावरुन वरील तीन संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांसह खांडगेदरा (संगमनेर), पिंप्री गवळी (पारनेर), बैजु बाभुळगाव (पाथडी), भोळेवाडी (अकोले), शेरणखेल (अकोले), अंबीखालसा (संगमनेर) व कानडगाव (राहुरी) या दहा समित्यांची जिल्हा समितीकडे शिफारस करण्यात आली होती.
वनीकरण, मृद व जलसंधारण, वनसंरक्षण, वणवा प्रतिबंधक उपाय, वनक्षेत्रावरील अतिक्रमणास प्रतिबंध, चराईबंदी, वन्य, पशू, पक्षी संरक्षण, पाणवठा, श्रमदान, लोकसहभाग, वनेतर पर्यायी इंधनाचा वापर, जनजागृती, रेकॉर्ड ठेवणे आदी निकषांनुसार निवड केली जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2014 1:26 am

Web Title: sant tukaram vangraam yojana
Next Stories
1 निर्मला राशिनकर यांचा सत्कार
2 गृहमंत्र्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा
3 कृती समितीचे ‘चक्का जाम’
Just Now!
X