04 March 2021

News Flash

सप्तशृंगी बचत गट स्वस्त दरात भाजी विक्री करणार

कल्याण येथील सप्तशृंगी स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या महिलांनी स्वस्त दरात भाजी विक्री करण्याचा

| September 11, 2013 08:56 am

कल्याण येथील सप्तशृंगी स्वयंसाहाय्यता बचत गटाच्या महिलांनी स्वस्त दरात भाजी विक्री करण्याचा उपक्रम सुरू केला आहे. वाहनाद्वारे रामबागेत निरनिराळ्या संकुलांत फिरून बचत गटाच्या महिला भाजी विक्री करणार आहेत.
माजी महापौर वैजयंती गुजर घोलप यांच्या संकल्पनेतून या बचत गटाने हा विक्री व्यवसाय सुरू केला आहे. टेम्पो रिक्षा वाहनात लोखंडी रॅक्स टाकून भाज्यांचे क्रेट ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जुन्नर परिसरातून या महिला भाजी खरेदी करणार आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय भाज्यांची विक्रीही केली जाईल, असेही गुजर-घोलप यांनी सांगितले. भुजबळ वाडी परिसरातील नागरिकांनी पहिल्याच दिवशी गाडीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बचत गटाच्या सर्व सदस्यांना या योजनेचा फायदा होईल, असा विश्वास अध्यक्षा वैशाली गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2013 8:56 am

Web Title: saptashrungi micro saving group set to sell vegetables cheap
Next Stories
1 बलात्काऱ्यांना फाशी देण्याची मागणी
2 पोलीसदादा नको रे बाबा..
3 कानसई गणेशोत्सव मंडळाने सातत्याने पर्यावरण स्नेही धोरणाचा आदर्श ठेवला अंबरनाथच्या कानसई गणेशोत्सवाचा आदर्श!
Just Now!
X