रेणापूर व अहमदपूर तालुक्यांत बुधवारी सायंकाळी चांगला पाऊस झाला. या पावसामुळे पेरणी झालेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे, तर नव्याने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.
सुमारे तासभर पावसाच्या सरी बरसल्या. रेणापूर मंडळात ३० मिमी, कारेपूर ३९, तर पोहरेगावात २० मिमी पाऊस झाला. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंद मंडळात २५, हडोळती ३१, तर अंधोरीत २२ मिमी पाऊस झाला. चाकूर तालुक्यातील चाकूर मंडळात ११, वडवळ १२, झरी मंडळात १८ मिमी, जळकोट मंडळात १७, तर निलंगा तालुक्यातील निटूर मंडळात ८ मिमी पाऊस झाला. गुरुवारी सकाळी आठपर्यंत संपलेल्या २४ तासांत जिल्हय़ात सरासरी ६.१६ मिमी पाऊस झाला.
जिल्हय़ात आतापर्यंत सरासरी ८८.४ मिमी पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस जळकोट तालुक्यात ११३ मिमी, अहमदपूर १०७, उदगीर ९१, रेणापूर व चाकूर ९७, निलंगा ९२.५, देवणी ९२, औसा ६९.४, लातूर ७७.८, तर शिरूर अनंतपाळमध्ये ४६ मिमी पाऊस झाला. जिल्हय़ात याही वर्षी मृग नक्षत्रात असमान पद्धतीनेच पाऊस बरसला. उदगीर तालुक्यातील हेर मंडळात आतापर्यंत १६६ मिमी, तर औसा तालुक्यातील बेलकुंड मंडळात केवळ ३१ मिमी असा कमी पाऊस झाला.
जिल्हय़ात सर्वात कमी पाऊस लातूर तालुक्यातील बाभळगाव ५६, औसा तालुक्यातील लामजना ५५, किल्लारी ५५, मातोळा ५८, रेणापूर तालुक्यातील पानगाव ५६, उदगीर तालुक्यातील मोघा ५८, नागलगाव ५०, निलंगा तालुक्यातील पानचिंचोली ५६, शिरूर अनंतपाळ तालुक्यातील साकोळ ४२, शिरूर अनंतपाळ ४६, तसेच सिसामाबाद (उजेड) मंडळात ५० मिमी झाला.