21 September 2020

News Flash

धनदांडग्यांच्या कचाटय़ातून गंगाखेडला सोडवा- गव्हाणे

गंगाखेड विधानसभा येथील मतदारांनी नेहमीच धनशक्तीला पराभूत करून सर्वसामान्य माणसांना निवडून आणले. आता मात्र हा मतदारसंघ धनवानांच्या कचाटय़ात अडकला असून, येथील मतदारांनी धनदांडग्यांना पराभूत

| June 15, 2013 01:50 am

गंगाखेड विधानसभा मतदारसंघ पूर्वी तत्त्वनिष्ठेसाठी प्रसिद्ध होता. येथील मतदारांनी नेहमीच धनशक्तीला पराभूत करून सर्वसामान्य माणसांना निवडून आणले. आता मात्र हा मतदारसंघ धनवानांच्या कचाटय़ात अडकला असून, आगामी निवडणुकांत येथील मतदारांनी धनदांडग्यांना पराभूत करावे व सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या उमेदवारांच्या पाठीशी शक्ती उभी करावी, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस माजी आमदार विजय गव्हाणे यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती गंगाखेड येथे पार पडली. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात गव्हाणे बोलत होते. खासदार गणेश दुधगावकर, प्रा. राम िशदे, गणेश हाके, हरीभाऊ शेळके, भाजपा जिल्हाध्यक्ष विठ्ठल रबदडे, डॉ. शिवाजी दळणर, अॅड. व्यंकट तांदळे, मारोतराव बनसोडे, रामप्रभू मुंढे आदी या वेळी उपस्थित होते. गव्हाणे यांनी नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती निश्चित मिळतील, असा आशावाद या वेळी व्यक्त केला.
धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी ठोस पावले उचलली होती. मात्र, त्यांचे सरकार सत्तेवरून गेल्याने अजूनही या समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळाल्या नाहीत. धनगर समाजाने भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्यास हा प्रश्न सुटेल, असे गव्हाणे म्हणाले. खासदार दुधगावकर यांनी संसदेच्या अधिवेशनात आपण आरक्षण विषयावर १५ मिनिटे चर्चा घडवून आणली, असे सांगितले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याचे आश्वासन दिले होते. तो शब्द त्यांनी पाळला नाही. आगामी काळात धनगर समाजाला राजकीय प्रतिनिधीत्व मिळाले पाहिजे. महाराष्ट्रात या समाजाचा एकही खासदार लोकसभेत नाही. लोकसंख्येनुसार युतीने धनगर समाजाला लोकसभेसाठी न्याय द्यावा, असे रबदडे म्हणाले. गोिवदराव कचाले यांनी सूत्रसंचालन केले. नारायण शेंडगे यांनी आभार मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:50 am

Web Title: save gangakhed from clutches of rich persons gavane
Next Stories
1 चोरून विक्री केलेल्या १८ मोटरसायकली जप्त
2 विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; लातूरचे शैक्षणिक संकुल हादरले
3 जूनची सरासरी ओलांडली
Just Now!
X