News Flash

पाण्याचे दुर्भिक्ष, तरीही दीड कोटींचा निधी वाया

ठाणे जिल्ह्य़ातील अनेक गाव-पाडे तहानलेले असताना लघुपाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे यंदा तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचे निष्पन्न झाले आहे.

| May 21, 2014 07:05 am

ठाणे जिल्ह्य़ातील अनेक गाव-पाडे तहानलेले असताना लघुपाटबंधारे खात्याच्या हलगर्जीपणामुळे यंदा तब्बल दीड कोटी रुपयांचा निधी परत गेल्याचे निष्पन्न झाले आहे. आचारसंहितेनंतर सोमवारी ठाणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यात ही बाब उघडकीस आली. पालकमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत.
 नियोजन मंडळाच्या बैठकीत २०१३-१४च्या खर्चाचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्हाधिकारी पी. वेळारासू यांनी लघुपाटबंधारे विभागाकडील १ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी परत गेल्याचे लक्षात आणून दिले. आचारसंहिता असल्याने निधी खर्च करता न आल्याचे स्पष्टीकरण अधिकाऱ्यांनी दिले, परंतु १ डिसेंबरपासून पाठपुरावा करूनही निविदा प्रक्रिया वेळेत का राबविता आली नाही, असा प्रश्न पालकमंत्र्यांनी विचारला. राज्यमंत्री गावीत तसेच आमदार विवेक पंडित यांनीही याबाबतीत नाराजी व्यक्त केली. तसेच बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 7:05 am

Web Title: scarcity of water in thane
टॅग : Thane
Next Stories
1 इमारतीवरून पडून रहिवाशाचा मृत्यू
2 डावखरे-फाटकांच्या मनसुब्यांना धक्का
3 तरणतलाव दोन महिने बंद
Just Now!
X