26 May 2020

News Flash

विज्ञान प्रदर्शनातून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तिची भरारी

सौर उर्जेवर आधारित सौर कार.. पवनचक्की.. ओव्हन.. इतकंच नव्हे तर ठिबक सिंचन यांसारख्या प्रकल्पाद्वारे आपल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार

| March 31, 2015 06:49 am

सौर उर्जेवर आधारित सौर कार.. पवनचक्की.. ओव्हन.. इतकंच नव्हे तर ठिबक सिंचन यांसारख्या प्रकल्पाद्वारे आपल्या कल्पनाशक्तीचा आविष्कार येथील रासबिहारी इंटरनॅशनल स्कूलतर्फे आयोजित विज्ञान प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांनी दाखविला.
या प्रदर्शनात इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या एकूण १४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. एकूण २५ प्रकल्प या वेळी मांडण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन शिवसरस्वती फाऊंडेशनच्या अध्यक्ष सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते झाले. त्यांनी प्रदर्शनातील प्रयोगांचे निरीक्षण करून विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. प्रकल्पांविषयी त्यांनी स्वत: विद्यार्थ्यांकडून जाणून घेतले. शाळेने दिलेले हे उत्तम व्यासपीठ असल्याचे कोकाटे यांनी नमूद केले. या विज्ञान प्रदर्शनात मुलांनी सौर ऊर्जा दिवसेंदिवस किती महत्त्वपूर्ण होणार आहे, त्यासह शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाशिवाय गत्यंतर नाही हे दाखविणारे प्रयोग सादर केले होते. याशिवाय पाणीबचत, जैवविविधता, वातदबाव, भविष्यातील पिढीसमोरील आव्हाने, जलसंवर्धन, आर्किमिडीज स्क्रू, प्राचीन संस्कृती, गायीच्या शेणापासून बॅटरी, फायर अलार्म असे वेगवेगळे प्रयोग मुलांनी तयार करून त्यांचे स्पष्टीकरण, उपयोग याची माहिती प्रत्येकाला देण्यात येत होती. गणितावर आधारित ‘मॅथम इंटिग्रेशन विथ क्रिकेट’ या प्रयोगाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात आले होते.
शाळेचे माजी विद्यार्थी प्रा. किरण पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाचे परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांनी मुलांच्या कौशल्याचे, सादरीकरणाचे व विचारशक्तीचे कौतुक केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2015 6:49 am

Web Title: science exhibition 3
टॅग Nashik,Nashik News
Next Stories
1 सातपूरमध्ये एकाचवेळी ११२ वृक्षांची तोड
2 पिंपळगाव महाविद्यालयातर्फे नौकानयनपटूंचा गौरव
3 शिक्षकांच्या भविष्यनिर्वाह निधी समस्यांविषयी एप्रिलमध्ये शिबीर
Just Now!
X