ढाणकी, डोंगरी, भाग व पनगंगा अभयारण्य परिसरातील शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे पिकांची उगवण झालेली नसल्याचे काही शेतात दिसून येत आहे. मात्र, चिबाडी व नदीनाल्याकाठावरील शेतात गवताची शेती, तर काही शेतात पिके उगवल्यामुळे तणनाशकाचा उपयोग केल्याने काळे रान दिसत आहे. अशाप्रकारे निसर्गाची साथ नसल्याने ढाणकी परिसरातील शेतजमीन पडित अवस्थेत आहे.
यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला असून शेतकऱ्यांनी दुबार, तिबार पेरणी करूनही अतिवृष्टीमुळे पिकांची उगवण झालेली नसल्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी या परिसरातील संकटग्रस्त शेतकऱ्यांची आहे. याची दखल घेऊन सव्र्हे करून पीडित शेतकऱ्यास आर्थिक मोबदला देण्यात यावा, अशी मागणी या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. महसूल व कृषी विभागाकडून त्वरित सव्र्हे करून आर्थिक मदत देण्यात यावी.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 24, 2013 9:36 am