26 September 2020

News Flash

चोरून विक्री केलेल्या १८ मोटरसायकली जप्त

शहर व परिसरातून चोरून विकलेल्या सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या १८ मोटरसायकली सिडको पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत जप्त केल्या. या वेळी तीन आरोपींना अटक करण्यात

| June 15, 2013 01:49 am

शहर व परिसरातून चोरून विकलेल्या सुमारे ५ लाख रुपये किमतीच्या १८ मोटरसायकली सिडको पोलिसांनी शुक्रवारी केलेल्या कारवाईत जप्त केल्या. या वेळी तीन आरोपींना अटक करण्यात आली. तेजराव श्रीराम राठोड (वय २५, दुधनातांडा, तालुका व जिल्हा औरंगाबाद), सिरजखान अब्दुल्लाखान (वय ३०, यासीननगर, हर्सूल, औरंगाबाद) व शेख जाकेर राजमहंमद पटेल (वय ३५, फुलेनगर, हर्सूल, औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत. औरंगाबाद शहर व परिसरातून चोरलेल्या या दुचाक्यांची प्रामुख्याने ग्रामीण भागात कमी किमतीला विक्री करून कागदपत्रे आणून देण्याच्या बहाण्याने निघून गेलेले आरोपी परत मात्र फिरकत नसत, असे पोलिसांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 15, 2013 1:49 am

Web Title: secretly disposed 18 motorcycles seize
Next Stories
1 विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार; लातूरचे शैक्षणिक संकुल हादरले
2 जूनची सरासरी ओलांडली
3 सात वर्षांनंतर जूनमध्ये नांदेडात पाऊस बरसला
Just Now!
X