News Flash

समाजाकडे डोळसपणे बघावे- नीलिमा मिश्रा

समाजातूनच आपल्याला अनेक कल्पना मिळतात. फक्त आपल्याला त्या डोळसपणे जाणून घ्याव्या लागतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका नीलिमा मिश्रा यांनी केले. पंचवटीतील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या

| February 14, 2013 12:48 pm

समाजातूनच आपल्याला अनेक कल्पना मिळतात. फक्त आपल्याला त्या डोळसपणे जाणून घ्याव्या लागतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेविका नीलिमा मिश्रा यांनी केले. पंचवटीतील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या.
प्रत्येकाने अधिकारापेक्षा जबाबदारी ओळखली पाहिजे. कोणाचे लाचार राहाणार नाही याची दक्षता घेतल्यास सर्व आनंदी होतील. निसर्गाला मित्र बनविल्यास आपले प्रश्न सुटतील, असे मांडत बचत गटांचे अनेक अनुभव त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. पोलीस उपायुक्त साहेबराव पाटील यांनी स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घ्यावयास हवी, त्याशिवाय ध्येय गाठता येणार नाही असे नमूद केले. या वेळी कंठशहनाईवादक गोकुळ सिन्नरकर यांचा महाविद्यालयातर्फे ‘पंचवटीरत्न’ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रास्तविक प्रा. आर. एन. शेलार यांनी केले. प्राचार्य डॉ. बापूसाहेब जगदाळे यांनी नीलिमा मिश्रा यांचा परिचय करून दिला. आभार उपप्राचार्य डॉ. आर. पी. भामरे यांनी मानले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2013 12:48 pm

Web Title: see with right vision towards world neelam mishra
Next Stories
1 नुकसानीचा आकडा कोटय़वधीच्या घरात
2 मनमाडमध्ये १५ टँकरव्दारे पाणी पुरवठय़ास मंजुरी
3 ध्येयनिष्ठ व्यक्तिमत्त्व : अण्णा करंजकर
Just Now!
X