News Flash

प्रशिक्षणातून विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचा धडा

स्व-संरक्षण करणे स्वत: शिकायला हवे याचा धडा येथील वावरे महाविद्यालयात आयोजित महिला स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनींना मिळाला.

| January 11, 2014 02:48 am

स्व-संरक्षण करणे स्वत: शिकायला हवे याचा धडा येथील वावरे महाविद्यालयात आयोजित महिला स्व-संरक्षण प्रशिक्षण वर्गातून विद्यार्थिनींना मिळाला. या प्रशिक्षणाचा समारोप मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे संचालक नाना महाले, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. काजळे, प्रा. एस. के. शिंदे आदी उपस्थित होते. प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर पवार यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. नीलिमा पवार यांनी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. मन, मनगट आणि मेंदू या त्रिसूत्रीचा विद्यार्थ्यांनी अवलंब करावा. सुदृढ आरोग्यासाठी योगाचा अभ्यास करण्याची सूचना त्यांनी केली. या वेळी मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या प्रा. मनीषा गिरासे, प्रा. वैशाली शेवाळे, प्रा. एस. आर. निकम यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. बी. पी. कुटे, प्रा. एन. एम. शिंदे, डॉ. आर. के. दातीर हेही उपस्थित होते. जिमखाना विभागप्रमुख प्रा. मीनाक्षी गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली चेतना शर्मा आणि पथकाने कराटेचे प्रात्यक्षिक सादर केले. सूत्रसंचालन प्रा. एस. टी. घुले यांनी केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2014 2:48 am

Web Title: self defence and personal protective training for girls
Next Stories
1 त्या दुकानांची नावे ‘लिकर शॉप’ठेवण्याची मागणी
2 विज्ञान प्रदर्शनात २० प्रकल्प सादर
3 चाळीसगावमध्ये लवकरच मका प्रक्रिया उद्योग
Just Now!
X