व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी जीवनात शारीरिक शिक्षण आणि खेळ किती महत्त्वाचा आहे याबद्दल स्वातंत्र्यपूर्व काळात सातत्याने प्रबोधन करणारे दत्तात्रय नारायण लाड यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त त्यांच्या केवळ ३२ वर्षांच्या कारकीर्दीचा ठसा उमटविणाऱ्या ‘८ जानेवारी १९४७’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुंबईत हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे संचालक सुरेश देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

दत्तात्रय लाड यांचा नातू सोमदत्त लाड यांनी हे पुस्तक तयार केले असून या पुस्तकात खेळाडूंच्या व्यक्तिमत्त्वावर तसेच १९३६ मधील बर्लिन ऑलिम्पिक स्पर्धेवर विशेष प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून खेळाविषयी जाणीव निर्माण व्हावी आणि अधिकाधिक खेळाडू निर्माण व्हावेत यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे.