अनेकदा आजारापेक्षा त्याची भीतीच अधिक मारक ठरते. कॅन्सरसारख्या आजारात औषधांबरोबरच धीर आणि दिलासा देणारी मात्राही उपयोगी ठरते. हे वास्तव लक्षात घेऊन कॅन्सर पूर्णपणे बरा झालेल्या काही रुग्णांनी एकत्र येत मुंबई-ठाण्यात ‘आधाररेखा’ हा स्वमदत गट स्थापन केला आहे. या स्वमदत गटात कॅन्सर रुग्णांबरोबरच त्यांच्या नातेवाइकांचाही समावेश आहे. कॅन्सरच्या रुग्णांना मार्गदर्शन, धीर तसेच जमल्यास मदत करणे हा या गटाचा उद्देश आहे. या उपक्रमाची रूपरेखा आणि भविष्य ठरविण्यासाठी रविवार १९ मे रोजी सकाळी ९.३० वाजता प्रणव, ब्राह्मण सोसायटी, ठाणे (प.) येथे एक सुसंवाद सभा आयोजित करण्यात आली आहे. याविषयी अधिक माहितीसाठी संपर्क- अरविंद जोशी- ९९६९०३८८१४.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 10, 2013 12:22 pm