‘आरोग्यम् धनसंपदा’ असे म्हणतात. उत्तम आरोग्य ही संपत्तीच असते. मात्र सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आपल्यासमोर आरोग्यासंदर्भात अनेक समस्या निर्माण होतात. या समस्यांचा ऊहापोह करण्यासाठी ‘लोकसत्ता’च्या वतीने ‘आरोग्यमान भव’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य संदर्भातील प्रश्न, जीवनशैली, आहार, मानसिक आरोग्य या संदर्भात खास परिसंवाद आणि आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन या कार्यक्रमात करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टर यामध्ये मार्गदर्शन करणार आहेत. २० आणि २१ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ठाण्यातील टिप टॉप प्लाझा येथे ‘आरोग्यमान भव’चे आयोजन करण्यात आले आहे. विख्यात शल्यचिकित्सक व लेखक डॉ. रवी बापट हे ‘सर्वसाधारण आरोग्य’ या विषयावर सकाळी १० वाजता उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत, तर सकाळी ११.१५ वाजता दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध आहारतज्ज्ञ वैद्य सुचित्रा कुलकर्णी या ‘आहार आणि आरोग्य’ या विषयावर आपले विचार मांडतील. केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. शुभांगी पारकर या १२.१५ वाजता ‘मनाचे आरोग्य’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. शनिवारी आणि रविवारी दोन दिवस याच वेळेला आणि याच विषयांवर वेगवेगळय़ा श्रोत्यांसमोर या परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. श्रोत्यांच्या निवडक प्रश्नांनाही तज्ज्ञ डॉक्टर उत्तरे देणार आहेत.

प्रवेशिका कोठे मिळणार?
या कार्यक्रमासाठी ३० रुपये प्रवेश शुल्क असून प्रवेशिका १६ सप्टेंबरपासून लोकसत्ता, कुसुमांजली, दुसरा मजला, गोखले रोड, कॉसमॉस बँकेच्या वर, नौपाडा, ठाणे (पश्चिम) येथे आणि टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (पश्चिम) येथे सकाळी १० ते संध्याकाळी ५ या वेळेत उपलब्ध असतील.

How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…

आरोग्यमान भव!
(आरोग्य विषयांवर परिसंवाद व प्रदर्शन)
* २० आणि २१ सप्टेंबर, सकाळी १० वा.
*  टिप टॉप प्लाझा, एल. बी. एस. मार्ग, ठाणे (प.)