शिक्षण मंडळ कराड व आत्माराम विद्यामंदिर ओगलेवाडी यांच्या वतीने देण्यात येणारा प्रेरणा पुरस्कार ज्येष्ठ छायाचित्रकार व सामाजिक कार्यकर्ते दत्ता भट यांना जाहीर झाला आहे. येत्या गुरुवारी (दि. ७) दुपारी ४ वाजता आत्माराम विद्यामंदिराच्या प्रांगणात भट यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्कर वितरण समारंभास माजी खासदार श्रीनिवास पाटील, शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मुकुंदराव कुलकर्णी, सचिव प्रा. डॉ. श्रीकांत सबनीस, मुख्याध्यापक मिलिंद पाठक यांची उपस्थिती राहणार आहे. सत्कारमूर्ती दत्ता भट हे आत्माराम विद्यामंदिराचेच माजी विद्यार्थी तसेच माजी विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष आहेत. कराड फोटोग्राफर्स असोसिएशन, रोटरी क्लब कराड या संघटनांचे अध्यक्ष म्हणून तसेच विविध संस्थांवर केलेल्या कार्याबद्दल त्यांना प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात येत आहे.

Kishori Pednekar, pre-arrest bail,
करोना वैद्यकीय साहित्य खरेदीतील गैरव्यवहार प्रकरण : पोलिसांच्या ना हरकतीनंतर किशोरी पेडणेकर यांना अटकपूर्व जामीन
Senior colorist Ashok Mulye majha puraskar award ceremony
परोपकारात रमलेला रंगकर्मी
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
president droupadi murmu presents bharat ratna awards at rashtrapati bhavan
राष्ट्रपतींच्या हस्ते भारतरत्न पुरस्कार प्रदान