28 May 2020

News Flash

नाटकाच्या जाहिरातीसाठी मालिका मालिकेच्या जाहिरातीसाठी नाटक

मराठी नाटकांकडे तरुण प्रेक्षक वळविण्यासाठी आणि नाटकाचे बुकिंग वाढविण्यासाठी मराठी निर्मातेही मार्केटिंगचे नवनव्या क्लृप्त्या वापरत आहेत.

| January 4, 2014 02:06 am

मराठी नाटकांकडे तरुण प्रेक्षक वळविण्यासाठी आणि नाटकाचे बुकिंग वाढविण्यासाठी मराठी निर्मातेही मार्केटिंगचे नवनव्या क्लृप्त्या वापरत आहेत. ‘भद्रकाली प्रॉडक्शन’चे प्रसाद कांबळी यांनीही आपल्या ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ या नव्या नाटकाच्या मार्केटिंगसाठी ही कृप्ती लढविली आहे.
दूरदर्शन मालिका आणि नाटक ही दोन्ही माध्यमे वेगळी असली तरी ती एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे कधी एखाद्या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांचा किंवा त्या मालिकेचा आधार घेऊन तर कधी नाटकाच्या माध्यमातून त्या मालिकेची प्रसिद्धी केली जात आहे. भद्रकाली प्रॉडक्शनतर्फे जे नवीन नाटक रंगभूमीवर सादर झाले आहे, त्याची प्रसिद्धी काही दिवसांपूर्वी ‘राधा ही बावरी’ या लोकप्रिय मालिकेतून करण्यात आली होती. नाटकातील प्रमुख भूमिकेत असलेल्या अभिनेत्री ऐश्वर्या नारकर आणि प्रतिक्षा लोणकर या दोघी मालिकेत ‘डॉ. राधा’ यांना भेटायला येतात, असा एक प्रसंग दाखवला होता. या प्रसंगातून नाटकाची जाहिरात चांगल्याप्रकारे केली गेली होती.
आता ‘राधा ही बावरी’ या लोकप्रिय मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत ‘आम्ही सौ. कुमुद प्रभाकर आपटे’ या नाटकाचा प्रयोग रंगणार आहे. ४ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात होणाऱ्या नाटकाच्या प्रयोगाला ‘राधा ही बावरी’ मालिकेतील कलाकार-तंत्रज्ञ आदी उपस्थित राहणार आहेत. या नाटकाच्या निर्मात्या कविता मच्छिंद्र कांबळी असून नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन विरेन यांचे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 4, 2014 2:06 am

Web Title: serials to advertise drama
टॅग Drama,Serials
Next Stories
1 सिंधुताई सपकाळ, अशोक पत्की, सुखठणकर यांना ‘राजहंस’ पुरस्कार
2 प्रा. वामन केंद्रे यांचा गुरू गौरव सोहळा
3 ठाण्यात रंगणार ‘उपवन आर्ट महोत्सव’
Just Now!
X