27 October 2020

News Flash

नवी मुंबई केंद्रावर सव्‍‌र्हर डाऊन

मुंबई महानगरपालिकेच्या एक हजार लिपिक पदांसाठीची ऑनलाइन परीक्षा आज घेण्यात आली.

| June 14, 2014 07:10 am

मुंबई महानगरपालिकेच्या एक हजार लिपिक पदांसाठीची ऑनलाइन परीक्षा आज घेण्यात आली. मात्र नवी मुंबईतील सानपाडा केंद्रावरील सव्‍‌र्हर डाऊन असल्याचे कारण देत ही परीक्षा संध्याकाळी साडेचार वाजेपर्यंत घेण्यात न आल्याने एकच गोंधळ उडाला होता. अखेर केंद्रावर पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
मुंबई, रायगड आणि ठाणे जिल्हय़ातील उमेदवारांसाठी सानपाडा येथील विश्वेश्वर एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत परीक्षेसाठी केंद्र होते. सकाळी आठ वाजता आलेल्या उमेदवारांना संध्याकाळी चार वाजेपर्यंत परीक्षा देता आली नव्हती. सव्‍‌र्हर डाऊन असल्याचे कारण केंद्राकडून देण्यात येत असल्याने अखेर संतप्त झालेल्या उमेदवारांनी केंद्र कर्मचाऱ्यांना धारेवर धरले होते. गोंधळाची परिस्थिती निर्माण होत असल्याचे पाहत तुर्भे पोलिसांना केंद्रावर पाचारण केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2014 7:10 am

Web Title: server down on navi mumbai centre
Next Stories
1 उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांखाली अनधिकृत झोपडय़ांचे पेव
2 पालिका अस्वच्छता प्रतिबंधक पथक नेमणार
3 सडलेल्या विद्युत खांबांमुळे उरण ग्रामस्थांवर टांगती तलवार
Just Now!
X