News Flash

उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त युवक राष्ट्रवादीचा नोकरी महोत्सव

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ऑगस्टला जिल्हास्तरीय ‘नोकरी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे.

| July 7, 2013 02:02 am

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ऑगस्टला जिल्हास्तरीय ‘नोकरी महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमातून किमान ११ हजार बेरोजगारांना नोकरीच्या संधी मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याची माहिती राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार व कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी पत्रकारांना दिली.
पक्षाचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, सरचिटणीस दिलिप शिंदे, अजित कदम, युवकचे निरीक्षक विक्रम कदम, प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे आदी उपस्थित होते. काल जिल्हा युवकच्या कार्यकारिणीची पक्ष कार्यालयात बैठक झाली. युवकची पूर्वीची कार्यकारिणी बरखास्त झाली असली तरी नवी कार्यकारिणी नियुक्त केली जाई पर्यंत जुन्याच पदाधिकाऱ्यांना प्रभारी म्हणून काम पाहण्यास सांगितले असल्याचे शेलार यांनी सांगितले.
समाजात वाढती बेरोजगारी आहे त्याचबरोबर औद्योगिक क्षेत्रात कुशल कामगार मिळत नसल्याचे कारखानदार सांगतात. त्यामुळे पात्र व क्षमताधारक युवक व कंपन्या यांच्यामध्ये समन्वय घालून देण्याचे काम होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. पक्ष कार्यालयाच्या समोरील मैदानात होणाऱ्या या महोत्सवात राज्यातील किमान १५० कंपन्या सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रवादी युवकने आता प्रभाग, गाव, गण व गटनिहाय बूथ समित्या स्थापन करण्याचा कार्यक्रम हाती घेतली असून विधानसभा मतदारसंघनिहाय अध्यक्ष नियुक्त केले जाणार आहेत. प्रत्येक समिती २० जणांची असेल. त्याची रचना कशा प्रकारे आहे, याची पुस्तिका पक्षाने तयार केली असल्याची माहिती काळे यांनी दिली. युवक कार्यकर्त्यांना तयार करण्यासाठी लवकरच एक दिवसाचे अभ्यास शिबिर आयोजित केले जाणार आहे, त्यात तज्ज्ञांना निमंत्रित केले जाणार आहे, अशी माहिती शेलार यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2013 2:02 am

Web Title: service festival by youth rashtrawadi
Next Stories
1 मनपा निवडणुकीची मोर्चेबांधणी ; शहर काँग्रेस स्वबळाच्या भूमिकेवर ठाम
2 सांगलीत आज मतदान
3 प्रेमलाकाकींच्या स्मृतिदिनी सोमवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन
Just Now!
X