जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्य़ातील सर्व शिधापत्रिकाधारकांचे (रेशनकार्ड) संगणकीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत ७ लाख ३० हजार शिधापत्रिकांचे संगणकीकरण झाले आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी सोपानराव कासार यांनी ही माहिती दिली. यासाठी शिधापत्रिकाधारकांनी विहीत नमुन्यातील अर्ज लिहून देणे आवश्यक आहे. त्याची मुदत ३१ डिसेंबपर्यंत आहेत. आपापल्या स्वस्त धान्य दुकानांमध्ये हे अर्ज उपलब्ध असून तिथेच ते जमा करून द्यायचे आहेत.
जिल्ह्य़ात एकूण ९ लाख ३७ हजार ५१७ शिधापत्रिकाधारक आहेत. त्यातील ७ लाख ३० हजार जणांच्या नोंदी संगणकात झाल्या आहेत.
उर्वरित २ लाख ७ हजार ३०४ जणांचे अर्ज जमा करून घेण्याचे काम सुरू आहे. ३१ डिसेंबपर्यंत त्यांनी नमुना अर्ज लिहून आपल्या स्वस्त धान्य दुकानात जमा केला नाही तर ते शिधापत्रिकेपासून वंचित राहतील असे कासार यांनी सांगितले. यापुढे रॉकेल, गॅस आदींचे सरकारी अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार असल्याचे शिधापत्रिकांचे संगणकीकरण करण्यात येत असल्याची माहिती कासार यांनी दिली.