News Flash

शाहरूख खान रुग्णालयातून घरी

खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया मंगळवारी झाल्यानंतर अभिनेता शाहरूख खान बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयातून घरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या

| May 31, 2013 12:19 pm

खांद्यावर यशस्वी शस्त्रक्रिया मंगळवारी झाल्यानंतर अभिनेता शाहरूख खान बुधवारी रात्री उशिरा रुग्णालयातून घरी गेल्याची माहिती सूत्रांनी दिली. ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या रोहित शेट्टी दिग्दर्शित चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी हाणामारीचे स्टण्ट्स करताना शाहरूख खानच्या खांद्याला दुखापत झाली होती. मंगळवारी शस्त्रक्रियेच्या वेळी वडिलांसोबत असावे म्हणून लंडन येथे शिक्षण घेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन हाही आला होता. यापुढे चित्रीकरणादरम्यान कोणत्याही स्वरुपाची हाणामारीची दृश्ये स्वत: न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी शाहरुखला दिला आहे. आता काही दिवस शाहरूखला घरीच विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2013 12:19 pm

Web Title: shahrukh khan back to home from hospital
टॅग : Shahrukh Khan,Surgery
Next Stories
1 असा आहे आठवडा !
2 पोलीस पडताळणीच्या फेऱ्यात क्लिन अप मार्शल
3 अस्वच्छ प्रसाधनगृहांच्या विरोधात महिलांचे महिलांसाठी अभियान
Just Now!
X