बॉलिवूडमधील आघाडीचे नायक आणि नायिका यांनी केलेली फॅशन, कपडे, हेअरस्टाईल याचे अनुकरण त्यांचे चाहते अर्थात फॅन्स नेहमी करत असतात. बॉलिवूडच्या ‘खान’दानातील शाहरुख नेहमी असेच काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात असतो. आपल्या आगामी ‘फॅन’या चित्रपटासाठी शाहरूख काहीतरी वेगळे करण्याच्या प्रयत्नात आहे. ऑस्कर विजेते रंगभूषाकार शाहरुखला खास नवा ‘लूक’ देणार आहेत.
‘ओम शांती ओम’मध्ये शाहरुखने ‘सिक्स पॅक्स’ दाखवले आणि त्याच्या चाहत्यांनाही अशा प्रकारे ‘सिक्स पॅक्स’ बनविण्यासाठी प्रवृत्त केले. काही वर्षांपूर्वी दूरदर्शवरून सादर झालेल्या ‘सर्कस’ या मालिकेत किंवा ‘राजू बन गया जंटलमन’ सारख्या त्याच्या सुरुवातीच्या चित्रपटात शाहरुख ‘स्टार’ न वाटता तुमच्या आमच्या घरातील एखादा तरुण मुलगा वाटावा, असा दिसायचा. ‘बाजीगर’मधये त्याने लावलेला ‘चष्मा’ त्यानंतर अनेकांनी स्टाईल म्हणून आपलासा केला होता. आपल्या प्रतिमेबद्दल जागरूक असणाऱ्या शाहरुखने आता ‘फॅन’ या चित्रपटासाठी आपला लूक बदलायचे ठरविले आहे. या चित्रपटासाठी शाहरुखला वेगळ्या रूपात सादर करण्याचे आव्हान हॉलिवूडमधील तसेच ऑस्कर पुरस्कार विजेते रंगभूषाकार ग्रेग कॅनाम यांनी स्वीकारले आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करणार आहे. शाहरुखला नवा ‘लूक’देण्यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी यशराज स्टुडिओमध्ये शाहरुख आणि ग्रेग कॅनाम यांची रंगीत तालीमही झाली. शाहरुखचा हा नवा ‘लूक’ कसा असेल, त्याची चर्चा बॉलिवूडमध्ये सुरू झाली आहे. हिंदी चित्रपटातून आत्तापर्यंत मी वेगवेगळ्या भूमिका केल्या पण ‘फॅन’ चित्रपटातील माझी भूमिका मला स्टारपण देणाऱ्या माझ्या ‘फॅन’नची असल्याचे शाहरुखचे म्हणणे आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 27, 2014 7:25 am