News Flash

गुजराती मतांचा धसका..

मॉर्निग वॉकहून, तसेच मंदिरात दर्शन घेऊन परतणारे गुजराती मतदार घरी जाण्यापूर्वी मतदान केंद्रात हजेरी लावत होते. हळूहळू दिवस चढू लागला आणि काही निवडक मतदारसंघांमधील मतदान

| October 16, 2014 02:25 am

मॉर्निग वॉकहून, तसेच मंदिरात दर्शन घेऊन परतणारे गुजराती मतदार घरी जाण्यापूर्वी मतदान केंद्रात हजेरी लावत होते. हळूहळू दिवस चढू लागला आणि काही निवडक मतदारसंघांमधील मतदान केंद्रांमध्ये गुजराती मतदारांचा टक्का वाढू लागला. गुजराती मतदारांची संख्या लोकसभा निवडणुकीइतकी नसली तरी याही वेळी ती नजरेत भरण्याजोगीच होती.  सकाळी साडेसात-आठच्या सुमारास गुजराती मतदारांची उपस्थिती चांगलीच वाढत असल्याचे दिसताच शिवसेना, काँग्रेस उमेदवारांची धावपळ सुरू झाली. मग ‘आपल्या हक्काच्या’ मराठी मतदारांना उतरविण्यासाठी मराठी उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांना पिटाळायला सुरुवात केली. दहिसर, बोरिवली, दक्षिण मुंबई आदी विभागांमध्ये गुजराती मतदार घोळक्याघोळक्याने मतदानासाठी घराबाहेर पडताना दिसत होते. गुजराती मतदार स्वत:हून मतदानासाठी उतरत होते. पण मराठी मतदारांना मतदानासाठी बोलवावे लागत होते. त्यामुळे भर दुपारी उन्हाचे चटके सहन करीत शिवसैनिक आणि काँग्रेस कार्यकर्त्यांना धावपळ करावी लागत होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2014 2:25 am

Web Title: shiv sena and congress worry about gujarati votes
Next Stories
1 चला, मतदान करू या!
2 आकाशकंदिल फक्त तीन हजार रुपये!
3 भाऊबीजनिमित्त‘बेस्ट’च्या जादा बसगाडय़ा
Just Now!
X