22 September 2020

News Flash

जिल्ह्य़ात शिवजयंती जल्लोषात

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शहरात आज उत्साह व जल्लोषात साजरी करण्यात आली.

| March 31, 2013 02:17 am

छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार जयंती शहरात आज उत्साह व जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवसेना व महाराष्ट्र निवनिर्माण सेना या दोन्ही राजकीय पक्षांनी यानिमित्ताने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. दोन्ही पक्षांनी एकाचेवेळी एकापाठोपाठ मिरवणुका काढल्या. उंट, घोडे, पारंपारिक कसरतीचे खेळ या मिरवणुकीचे आकर्षण ठरले.
आज सकाळपासूनच शहरात सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह होता. शिवसेना व मनसेच्या वर्चस्वाखालील मंडळे तसेच हिंदुत्ववादी संघटनांनी चौका, चौकात शिवप्रतिमांचे पूजन केले. शिवसेनेवर वेळेचा आक्षेप घेत मनसेने शहरात सकाळी मिरवणूक काढण्याची परवानगी मागितली होती, मात्र त्यांना दुपारी बाराची वेळ देण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांनी शिवसेनेबरोबरच म्हणजे दुपारी चारलाच मिरवणूक काढली. मिरवणुकीत अग्रभागी शिवसेना व त्यांच्यामागे मनसेचे मंडळ होते. मिरवणूक मार्गावर सर्वत्र पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
दुपारी चारवाजता जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून शिवसेनेच्या मिरवणुकीला प्रारंभ झाला. महापौर शीला शिंदे, आमदार अनिल राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते. शिवसेनेच्या पाठोपाठ येथूनच मनसेच्याही मिरवणुकीला प्रारंभ आला. घोडेस्वार, सांडणीस्वार असा लावजामा त्यांच्या मिरवणुकीत होता. मराठमोळ्या पारंपारिक कसरतींचे डाव हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले. वसंत लोढा, नगरसेवक किशोर डागवाले, गणेश भोसले, कैलास गिरवले, सचिन डफळ, संजय झिंजे आदी पदाधिकारी या मिरवणुकीत सहभागी झाले होते.
सायंकाळनंतर मिरवणूक रेंगाळण्यास सुरूवात झाली. रात्री ८ वाजता ही मिरवणूक कापड बाजार चौकापर्यंत आली होती. तोपर्यंत मिरवणुकीतील गर्दी प्रचंड वाढली होती.      

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 31, 2013 2:17 am

Web Title: shivajayanti celebrated in jubiliation all over in district
Next Stories
1 एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या आवारात आग
2 आ. औटींचा ठिय्या, २ कर्मचाऱ्यांवर गुन्हे
3 निर्मलग्राम योजनेत महिलांचे भवितव्य- पवार
Just Now!
X