शिवाजी विद्यापीठाच्या महिला फुटबॉल संघाने पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत प्रथमच विद्यापीठाचा संघ पात्र ठरला. या संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. सहा गुण घेऊन शिवाजी विद्यापीठ संघ पहिल्या क्रमांकावर राहिला. चार गुण घेऊन मुंबई द्वितीय, तर दोन गुणांसह अमरावती तृतीय क्रमांकावर व बरकतुल्ला विद्यापीठ भोपाळ चौथ्या क्रमांकावर राहिले.
शिवाजी विद्यापीठ आणि भोपाळच्या बरकतुल्ला विद्यापीठ यांच्यात झाला. २-१ अशी आघाडी कायम ठेवत शिवाजी विद्यापीठाने सामनाजिंकला. ‘शिवाजी’च्या आशालता फरांडे, भाग्यश्री स्वामी, शलाका गवळी, सुचिता पाटील, श्वेता पाटील, प्राची यादव, रेश्मा सय्यद यांचा खेळ चांगला झाला.
संत गाडगेबाबा विद्यापीठ, अमरावती आणि मुंबई विद्यापीठ यांच्या झालेल्या लढतीत मुंबई विद्यापीठ संघाने हा सामना ४-० गोलनी एकतर्फीजिंकला. बलाढय़ अशा पुणे, मुंबई, गोवा संघांना ‘शिवाजी’ने धूळ चारली. या संघाची गोलरक्षक स्वालिया थोडगे, प्राची यादव, बचाव फळीतील सुचिता पाटील, ऐश्वर्या हवालदार, पृथ्वी गायकवाड, मृदुल िशदे यांचा खेळ प्रेक्षणीय झाला. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष मालोजीराजे यांच्या हस्ते व कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संघाचा गौरव करण्यात आला.