शिवसेनेचे आमदार-खासदार असताना स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसैनिकांना सत्तेत वाटा असलाच पाहिजे, असा  इशारा माजी नगराध्यक्ष राजेद्र झावरे यांनी शिवसेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांना दिला.
संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलच्या हॉलमध्ये नुकताच शिवसैनिकांचा मेळावा तालुकाप्रमुख शिवाजीराव ठाकरे व उपजिल्हा प्रमुख कैलास जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाला. या वेळी बोलताना झावरे पुढे म्हणाले की, ग्रमपंचायत, सोसायटी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या सर्वसामान्यांसाठी काम करता येणाऱ्या संस्था असतात. मात्र या संस्थेत शिवसैनिकांना योग्य तो वाटा मिळत नाही. मग शिवसैनिकांचा वापर फक्त निवडणुकीपुरताच करणार का? असा संतप्त सवाल त्यांनी केला.
या वेळी बोलताना तालुकाप्रमुख ठाकरे यांनी यापूर्वी ज्या चुका झाल्या असतील तर त्या भविष्यात निश्चित दुरुस्त केल्या जातील. सर्व जुने शिवसैनिक व आमदार काळेंच्याबरोबर असणारे कार्यकर्ते यांचा समन्वय साधून तालुक्यातील ज्वलंत प्रश्न हाताळण्याला प्राधान्य देण्यास येईल. तसेच येत्या पंधरा दिवसांत तालुक्याचा जि. प. गटवार दौरा करून नवीन कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच शिवसैनिकांनीही केवळ मी निष्ठेचा कार्यकर्ता आहे. मला न्याय मिळावा, असे गृहीत न धरता स्वत: समाजकार्य करून आपले स्थान निर्माण करावे, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.
सदर मेळाव्यासाठी वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष मेहमूद सय्यद, डॉ. अजेय गर्जे, भरत मोरे, अनिल जाधव, अतुल काले, रावसाहेब ठेके, गंगाधर रहाणे, किरण होन, फारूकभाई पटेल, पोपटराव गोर्डे, शहाराम सिनगर, राजेंद्र शिलेदार, साहेबराव डुबे, शब्बीर शेख, आसाराम डहारे, संजय दंडवते, नानाभाऊ डोंगरे, प्रवीण चौधरी, दिगंर बढे, कैलास गव्हाणे, गिरधर पवार, अशोकराव कानडे, मधुकर टेके, बाळासाहेब मंचरे, बाळासाहेब सिनगर, दिलीप अरगडे, बाळासाहेब जाधव, सीताराम तिपायले, धर्मा जावळे, बाबासाहेब निकम, बाबासाहेब शिंदे, कैलास सिनगर, किरण कुदळे, नंदकुमार वाबळे, मंगेश चिंधे, प्रसाद टेके, महेश नाईक, अमोल शेलार, बापू सांगळे, संतोष झावरे, बालाजी बोर्डे, संतोष नेहे, अमित भास्कर, सागर लकारे यांच्यासह मोठय़ा संख्ेयने शिवसैनिक उपस्थित होते.