26 September 2020

News Flash

आजपासून श्रीसंकल्प प्रतिष्ठानचा वरळी सांस्कृतिक महोत्सव

श्रीसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने वरळी येथे २४ जानेवारीपासून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

| January 24, 2014 06:13 am

श्रीसंकल्प प्रतिष्ठानच्या वतीने वरळी येथे २४ जानेवारीपासून सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सलमान खानच्या उपस्थितीत या महोत्सवाचे उद्घाटन केले जाईल.
कबड्डी, फूटबॉल, लगोरी, कुस्ती, कॅरम, क्रिकेट आदी खेळांबरोबर विविध नृत्यकलाविषयक स्पर्धाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे. २६ जानेवारीपर्यंत या विविध स्पर्धाचा आनंद मुंबईकरांना घेता येईल.गेल्या वर्षी डोळ्यांचे पारणे फेडणारा लेझर शो या महोत्सवाचे आकर्षण होता. या वर्षी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी सकाळी ७ वाजता ‘रिपब्लिकन कलर रन’चे आयोजन करण्यात आले आहे. हे या महोत्सवाचे यंदाचे आकर्षण असेल. ही पाच किलोमीटरची एक मिनी मॅरेथॉन असेल. यात सेलिब्रिटींपासून लहानथोरांपासून सर्वाना सहभागी होता येईल.या शिवाय शनिवारी सायंकाळी ४ वाजता महालक्ष्मी, रिट्झ येथे खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कूक फॉर हर’ ही या महोत्सवाची संकल्पना असेल. पतीने पत्नीसाठी खाद्यपदार्थ बनविण्याचे आव्हान यात पेलावे लागणार आहे. सामाजिक जाणिवा जपणे, जाती-धर्मामध्ये सलोखा निर्माण करणे, कलागुणांना प्रोत्साहन देणे, राष्ट्रीय भक्तीला उजाळा देणे, या उद्देशाने आम्ही या महोत्सवाचे आयोजन करतो, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक व राज्यमंत्री सचिन अहिर यांनी दिली. तर या वेळचा महोत्सवही अभूतपूर्व ठरावा, असा आमचा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया श्रीसंकल्प प्रतिष्ठानच्या संचालिका संगीता अहिर यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2014 6:13 am

Web Title: shree sankalp pratishthans worli cultural festival starting from today
टॅग Mumbai News
Next Stories
1 खास क्षण क्लिप्समध्ये बंदीस्त करणे टाळा
2 विमानांच्या तिकिटांचाही लाट है, सेल है..
3 पुरातनवास्तू यादी : महालक्ष्मी परिसरही उद्रेकाची चिन्हे
Just Now!
X