16 December 2017

News Flash

श्रेया कुलकर्णी, अमृता देशमुख, सुनिल पारे प्रथम

बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वरगंधर्व रामभाऊ कुलकर्णी स्मृती सुगम संगीत स्पर्धेत विविध वयोगटात श्रेया

प्रतिनिधी, नगर | Updated: February 14, 2013 2:20 AM

सुगम संगीत स्पर्धेचे बक्षिस वितरण
बंदिश सांगीतिक प्रतिष्ठानच्या वतीने स्वरगंधर्व रामभाऊ कुलकर्णी स्मृती सुगम संगीत स्पर्धेत विविध वयोगटात श्रेया कुलकर्णी, अमृता देशमुख व सुनील पारे यांनी पहिला क्रमांक मिळवला.
प्रसिद्ध शास्त्रीय संगीत गायक पंडीत यादवराज फड यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले. महेश व सुहास कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. स्पर्धेतील विजेते याप्रमाणे- शालेय गट ५ वी ते ७ वी- संकर्ष वायभाये, आरूषी शौमिक, ओंकार ढोकणे, अथर्व काळे. इयत्ता ८ वी ते १२ वी- संकेत सुवर्णपाठकी, हर्षदीप शेलार, मृणाल ढवळे, अनिरुद्ध धर्माधिकारी. खुला गट- मंगेश कुलकर्णी, प्राची कुलकर्णी, श्रद्धा जाधव, अरूण आहेर.
स्पर्धकांना हर्षद भावे, मकरंद खरवंडीकर, मोहिनी लोखंडे, प्रसाद सुवर्णपाठकी, आनंद कुलकर्णी यांनी तबला, संवादिनीची साथ केली. परिक्षण आशाताई देशपांडे,
प्रकाश शिंदे, प्रदिप्ता चौधरी, ज्योती मुळे यांनी केले. सर्व विजेत्या स्पर्धकांच्या गायनाच्या मैफलीचे आयोजन बंदिश च्या वतीने १९ फेब्रुवारीला मधुरंजनी सभागृह पाईपलाईन रस्ता येथे करण्यात
आले आहे.

First Published on February 14, 2013 2:20 am

Web Title: shreya kulkarniamruta deshmukhsunil pare came first music competition