विद्यार्थ्यांमध्ये शिवरायांच्या इतिहासाची कायमस्वरूपी गोडी निर्माण व्हावी या उद्देशातून डोंबिवलीत इतिहासतज्ज्ञ निनाद बेडेकर यांची सात दिवसांची शिवचरित्र कथनमाला आयोजित करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. २७ एप्रिल ते ३ मे या कालावधीत रामनगरमधील चंद्रकांत पाटकर विद्यालयाच्या मैदानावर दररोज संध्याकाळी साडेसहा वाजता ही कथनमाला सुरू होणार आहे. आदिशक्ती युवाशक्ती मंडळाचे सदानंद थरवळ, भाऊसाहेब चौधरी आणि चंद्रकांत पाटकर ट्रस्टच्या जयंती पाटकर यांच्या सहकार्याने या कथनमालेचे आयोजन केले आहे.  या कथनमालेच्या नोंदणीसाठी नागरिकांनी संजित वायंगणकर, सुधीर पाटील यांच्याशी ८६९२९७६९८९ येथे संपर्क साधावा. सात दिवसांच्या कथनमालेत निनाद बेडेकर अनुक्रमे पुढील विषयावर व्याख्यान देणार आहेत. शिवराय आणि सह्य़ाद्री, शिवराय आणि समुद्र, शिवराय आणि श्रीकृष्ण, शिवराय आणि पत्रव्यवहार, शिवराय आणि महाराष्ट्रधर्म, शिवराय आणि रणसंग्राम, शिवचरित्रातून काय शिकावे. जिजाईनगर शिवसेना, सावरकर वाचनालय, ह प्रभाग कार्यालय चौक, ताश्कंद, रेतीभवन येथे मोफत प्रवेशिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

documentary on mangroves of maharashtra
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : पावलोपावली नवशिक्षण
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका
raju shetty allegations against dhairyasheel mane over development work
खासदारांचे विकासकामात गौडबंगाल, इतरांची कामे आपल्या नावावर खपवली; राजू शेट्टी यांचा धैर्यशील माने यांच्यावर आरोप
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी