धूमस्टाईल मंगळसूत्र चोरी, छोटे-मोठे अपघात, तसेच संशयास्पद व्यक्तींच्या हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे विणले जात असून, सिडको पोलीस ठाण्याने आतापर्यंत १६ कॅमेरे सार्वजनिक ठिकाणी बसविले आहेत. कॅनॉट मार्केटसारख्या ठिकाणी २४ कॅमेरे बसविले जाणार आहेत. गर्दीच्या ठिकाणी ‘नजर’ ठेवणे पोलिसांना यामुळे सोपे जाणार आहे.
टीव्ही सेंटर, जिजाऊ चौक, शरद टी जंक्शन, सिद्धार्थनगरजवळ अण्णा भाऊ साठे चौक अशा महत्त्वाच्या ठिकाणी गर्दीवर नियंत्रण ठेवणे या कॅमेऱ्यांमुळे शक्य होणार असल्याचे सिडकोचे पोलीस निरीक्षक प्रताप बाविस्कर यांनी सांगितले. पोलीस आयुक्त संजयकुमार यांच्या संकल्पनेतून, तसेच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त अरविंद चावरिया, सहायक पोलीस आयुक्त विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले.