13 August 2020

News Flash

सहा महिन्यांपासून गैरहजर राहणारे १८ शिक्षक निलंबित

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सेवेत हजर न राहता गेल्या सहा महिन्यांपासून दांडी मारणाऱ्या १८ कामचुकार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या

| August 31, 2015 05:16 pm

सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये सेवेत हजर न राहता गेल्या सहा महिन्यांपासून दांडी मारणाऱ्या १८ कामचुकार शिक्षकांना सेवेतून निलंबित करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील जन्मठेप झालेल्या एका शिक्षकाला सात दिवसांत बडतर्फ करण्याचा आदेशही या सभेत देण्यात आला.
जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. निशिगंधा माळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांच्यासह अर्थ व बांधकाम समितीचे सभापती शिवानंद पाटील, कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती जालिंदर लांडे, समाजकल्याण समितीचे सभापती शिवाजी कांबळे, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती जयमाला गायकवाड आदींची उपस्थिती होती.
मागील सहा महिन्यांपासून शाळांकडे न फिरकणाऱ्या शिक्षकांना सेवेत कशाला ठेवायचे, असा सवाल स्थायी समितीमध्ये  उपस्थित करून त्याबद्दल प्रशासनालाही धारेवर धरण्यात आले.   

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 8, 2012 3:36 am

Web Title: since 6 months absent 18 teachers are dismised
टॅग Solapur,Zp School
Next Stories
1 गर्दीत घुसमटणारे पादचारी अन् वाहतुकीचा विचका!
2 सबसे बडा खिलाडी; की पुण्यात काँग्रेसचा नवीन चेहरा
3 पाण्याच्या संघर्षांतील अग्रणी हरपला
Just Now!
X