News Flash

जमिनीच्या वादातून हल्ला, सहा जणांना अटक

जागेच्या वादातून हल्ला करणाऱ्या एका बिल्डरच्या सहा समर्थकांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी बांधकाम व्यावसायिक फरार आहे.

| January 13, 2015 07:46 am

जागेच्या वादातून हल्ला करणाऱ्या एका बिल्डरच्या सहा समर्थकांना दहिसर पोलिसांनी अटक केली आहे. मुख्य आरोपी बांधकाम व्यावसायिक फरार आहे.
फिर्यादी साहेबराव पवार यांची बोरीवली पूर्व येथील हनुमान टेकडी येथे सहा एकर जागा आहे. मागील तीस वर्षांपासून त्यांचा या जागेवर दावा आहे. या जागेवर त्यांचा कारखाना आणि कार्यालय आहे. परंतु एक बिल्डर अनिल शहा आणि केतन शहा यांनीही त्या जागेवर दावा सांगितल्याने वाद निर्माण झाला आहे. या जागेची कागदपत्रे माझ्या नावाची असून तुम्ही न्यायालयात दाद मागा आणि न्यायालय जो निर्णय देईल तो मान्य असेल असेही पवार यांनी या बिल्डरला सांगितले होते. परंतु बिल्डर त्यांना धमकी देत होता. त्या विरोधात त्यांनी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रारही दिली होती. शुक्रवारी काही माणसे पवार यांच्या कार्यालयात आली आणि त्यांनी ही जागा खाली करा असा दम देत हल्ला चढवला. यात पवार यांच्या डोळ्याला दुखापत झाली. आरोपींनी कार्यालयाचीही नासधूस केली. पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून दहिसर पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. मुख्य आरोपी बिल्डरला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2015 7:46 am

Web Title: six arrested for attack crime
टॅग : Loksatta,News
Next Stories
1 पालिका अधिकाऱ्यांचे मोबाइल बंद!
2 तोतया महेश भट्टची फिल्मी कहाणी
3 तबला, व्हायोलिन, खंजिरा आणि बासरीच्या जुगलबंदीने रसिक मंत्रमुग्ध
Just Now!
X