दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने तर अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या दोन दिवसात शहरात आत्महत्येच्या सहा घटना घडल्या.
दहावीत शिकत असलेल्या विशालक्ष्मी अशोक गहलोद (रा. कामगारनगर) या तरुणीने घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती इपी कॉन्व्हेंटमध्ये शिकत होती. तिचे वडील भविष्यनिधी कार्यालयात भंडारा येथे नोकरी करतात. रविवारी तिचे आई- वडील लग्नासाठी गेले होते. ती घरी एकटीच होती. सायंकाळी तिच्या वडिलांनी तिला फोन केला. मात्र, प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी घर मालकांना सांगितले. घर मालकांनी खिडकीतून डोकावून पाहिले असता त्यांना धक्काच बसला. त्यांनी अशोक गहलोद यांना कळविले. ते तातडीने घरी आले. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.  दक्षिण नागपुरातील शेष नगरात राहणाऱ्या एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी घडली. भूषण रमेश ब्राह्मणकर हे त्याचे नाव आहे. घरातील छताच्या पंख्याला नायलॉन दोरीने त्याने गळफास घेतला. त्याचे वडील काही वर्षांपूर्वीच वारले. तंत्रज्ञाचे काम करून तो रात्रकालीन महाविद्यालयात शिकत होता. रविवारी सकाळी त्याची आई तिच्या भावाकडे गेली होती. दुपारी ती घरी आली. भूषणने आत्महत्या केल्याचे दिसल्याने तिला धक्काच बसला. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
तिसरी घटना रात्री दहा वाजता उघडकीस आली. दीपक बालाजी मातेरे याने घरातील छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. चवथी घटना कामाक्षीगरात सोमवारी सायंकाळी घडली. िरकू विजय निनावे याने घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी नंदनवन पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. पाचवी घटना आसीनगरात दुपारी घडली. रेशम तरन्नुम अशरफ खान ही माहेरी आली होती. घरातील छताला लोखंडीला ओढणीने गळफास लावून तिने आत्महत्या केली. याप्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सहावी घटना सोमवारी दुपारी घडली. प्रतीक सुनील वासनिक (रा. पालकरनगर) याने घरातील छताच्या हूकला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.