नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात आली असून विदर्भात सर्वाधिक म्हणजे ३३ उमेदवार नागपूर मतदारसंघात आहेत. उमेदवारांना चप्पल, कोट, टोप, विजेचा खांब, शिट्टी, फुगा, मेणबत्ती आदी चिन्ह मिळाले आहे.
नागपुरात भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाइं (आ) व स्वाभिमानी शेतकरी संघटना महायुतीचे नितीन गडकरी यांना कमळ, बसपचे डॉ. मोहन गायकवाड यांना हत्ती, काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे विलास मुत्तेमवार यांचे हात, आम आदमी पक्षाच्या अंजली दमानिया यांना झाडू चिन्ह कायम आहे. डेमोक्रॅटिक सेक्युलर पक्षाचे अंसारी जावेद अहमद यांना स्टूल, गोंडवाना गणतंत्र पक्षाचे राममूर्ती चिमोटे यांना आरी, हिंदुस्तान जनता पक्षाचे डॉ. धर्मेद्र मंडलिक (पराते) यांना कपबशी, आंबेडकराईट पक्षाचे डॉ. प्रदीप नगराळे यांना कोट, रिपाइंचे घनश्याम फुसे यांना पतंग, मायनॉरिटी डोमोक्रॅटिक पक्षाचे बशीरखान यांना हंडी, जनता दल युनायटेडचे शहादी शरीफ यांना बाण, बहुजन मुक्ती पक्षाचे सुनील पेंदोर यांना चारपाई (खाट) चिन्ह मिळाले आहे.
अपक्ष उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्हे- अतिक अहमद मलिक (फुगा), अनिता टेकाम (शिवणयंत्र), एजाज खान (पाटी), कविता टिबडीवाल (बॅट),  राजेंद्र कानफाडे (टॉर्च), गौस मोहम्मद शेख अय्युम शेख (सिलेंडर), चंदा मानवटकर (चप्पल), जीवन रामटेके (टेलिफोन), दिलीप भोरकर (टोप), धीरज गजभिये (छताचा पंखा), पंकज भंसाळी (नारळ), बाबुराव मेश्राम (मेणबत्ती), बाबुलाल बंजारे (शिटी), मोहन कारेमोरे (बासरी), रवींद्र बोरकर (तंबू), राजेश साधनकर (अंगूर), शकील वसी अहमद (प्रेस), श्रीधर साळवे (बादली), अ‍ॅड. सुरेश शिंदे (ऑटो रिक्षा), सेनापती उत्तम (टीव्ही), विजय सोमकुवर (विजेचा खांब).
रामटेक मतदारसंघात बसपच्या किरण प्रेमकुमार रोडगे पाटणकर यांना हत्ती, शिवसेनेचे कुपाल बाळाजी तुमाने यांना धनुष्यबाण, काँग्रेस आघाडीचे मुकुल वासनिक यांना पंजा व आम आदमी पक्षाचे प्रताप गोस्वामी यांचे झाडू चिन्ह कायम आहे.
गोंडवाना गणतंत्र पक्षाचे गणेश पाटील यांना बॅट, समाजवादी पक्षाच्या माया चवरे यांना सायकल, बहुजन मुक्ती पक्षाचे नरेश पाटील यांना खाट, हिंदुस्तान जनता पक्षाचे पंकज मासुरकर यांना सिलेंडर, माकपचे बंडू मेश्राम यांना करवत, आंबेडकराईट पक्षाच्या विद्या भिमटे यांना कोट, अ.भा. फॉरवर्ड ब्लॉकचे संदेश भालेकर यांना सिंह, खोरिपचे डॉ. सुनील नारनवरे यांना पतंग, भारिप बहुजन महासंघाचे डॉ. संदीप नंदेश्वर यांना कपबशी चिन्ह मिळाले आहे. अपक्ष उमेदवार व त्यांना मिळालेली चिन्हे- चंद्रभान खोब्रागडे (दूरदर्शन), गुरुदास बावणे (नारळ), गौतम वासनिक (कपाट), अशोक डोंगरे (ऑटो रिक्षा), गोपाल अजाब तुमाने (एअर कंडिशनर), प्रा.डॉ. नत्थू लोखंडे (फुगा), नीलेश ढोके (छताचा पंखा), राहुल मेश्राम (टॉर्च), राहुलकांत उर्फ रमेश सिन्हा (हिरवी मिरची), गणेश लोखंडे (तुतारी). दरम्यान, ही चिन्हे निवडणूक आयोगाने निश्चित केली असून दैनंदिन घरगुती वापरातील या वस्तू असल्याचे स्पष्ट होते. नोंदणीकृत व मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय राजकीय पक्षांसाठी चिन्हे राखीव ठेवले जातात. इतर उमेदवारांना निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या चिन्हांपैकी तीन चिन्हे सूचवावी लागतात. निवडणूक निर्णय अधिकारी त्यातून एकाची निवड करतात. या चिन्हांमुळे प्रचारात रंगत येणार आहे. शिट्टी चिन्ह मिळालेला एखादा उमेदवार शिट्टी वाजवत फिरेल. तो शिट्टी वाटेलही. त्याला किंवा फुगा चिन्ह मिळालेल्या उमेदवाराला फुगे वाटणे परवडेलही. मात्र, दूरदर्शन संच अथवा शिवणयंत्र, कपाट आदी चिन्हे मिळालेल्यांचे काय, असा मनोरंजक सवाल विचारला जात आहे.

Loksatta Chavdi Happening In Maharashtra Politics News On Maharashtra Political Crisis
चावडी: ओ शेट.. भाषणबाजीच ग्रेट
21 candidates in the battle of Buldhana Lok Sabha Constituency additional ballot unit will have to be added
उमेदवारांची भाऊगर्दी, अतिरिक्त बॅलेट युनिट जोडावे लागेल… वाचा कुठे घडला हा प्रकार?
Yavatmal Washim Lok Sabha
भावना गवळींना डावलले; यवतमाळ-वाशिममधून राजश्री पाटील यांना उमेदवारी
VBA Candidate List
वंचित बहुजन आघाडीकडून पाच उमेदवारांची घोषणा, पुण्यातून वसंत मोरे यांना उमेदवारी