News Flash

बालकांपासून ते वृद्धांसाठी ‘संक्षिप्त ज्ञानेश्वरी’ प्रकाशित

शालेय विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्याच वयोगटांतील व्यक्तींना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची इच्छा असते. अनेकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. ज्ञानेश्वरीचे वाचन, मनन करणे

| August 6, 2013 09:13 am

शालेय विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्याच वयोगटांतील व्यक्तींना ज्ञानेश्वरीचा अभ्यास करण्याची इच्छा असते. अनेकांची ही इच्छा पूर्ण होत नाही. ज्ञानेश्वरीचे वाचन, मनन करणे मनात असूनही शक्य होत नाही. यावर प्रभावी उपाय म्हणून ज्ञानेश्वरीमधील दैनंदिन जीवनात उपयोगी पडणाऱ्या ओव्या घेऊन त्याच्या अर्थासह ‘संक्षिप्त ज्ञानेश्वरी’ डोंबिवलीत प्रकाशित करण्यात आली आहे.
संत वाङ्मयाच्या अभ्यासक डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी या संक्षिप्त ज्ञानेश्वरीची निर्मिती केली आहे. ५३ पानांच्या या ज्ञानेश्वरीत गीता महात्म्य, गुरुगौरव, भक्ती, कर्मयोग, ध्यान, ज्ञानयोग, दैनंदिन व्यवहारातील मानवी जीवनाला सार्थ ठरणारे मार्गदर्शन याविषयीची माहिती डॉ. कुलकर्णी यांनी साध्या सोप्या शब्दात मांडली आहे. या ग्रंथाविषयी लेखिका अनुराधा कुलकर्णी यांनी सांगितले की, मूळ ज्ञानेश्वरी ही सातशे वर्षांपूर्वीची आहे. त्यामधील भाषेचा वापर प्राचीन आहे. १८ अध्याय आणि नऊ हजार ओव्या मूळ ज्ञानेश्वरीत आहेत. प्रत्येकाला ही ज्ञानेश्वरी वाचणे आणि हाताळणे सहज शक्य नसते. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीविषयी शिकवले जाते. प्रत्यक्षात ज्ञानेश्वरी पाहण्यास, ऐकण्यास मिळत नाही. अनेक नागरिकांना दैनंदिन जीवनातील धावपळीत ज्ञानेश्वरी वाचण्याची, आचरणात आणण्याची इच्छा असूनही पूर्ण करता येत नाही. या सर्व परिस्थितीचा विचार करून ‘संक्षिप्त ज्ञानेश्वरी’ची निर्मिती केली आहे. शाळा, महाविद्यालये, ज्येष्ठ नागरिक संघ, चाकरमानी मंडळी नजरेसमोर ठेवून ही निर्मिती केली आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले. विद्यानिकेतन विद्यामंदिरासह डोंबिवली परिसरातील काही शाळांनी संक्षिप्त ज्ञानेश्वरीसाठी अगोदरच मागणी नोंदविली आहे. या ग्रंथाच्या माहितीसाठी संपर्क, कुलकर्णी ९९२०२९१८२५. 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2013 9:13 am

Web Title: small dnyaneshwari published for all age group
Next Stories
1 ‘कलाकारांनी अभिनयाबाबत गंभीर असणे गरजेचे’
2 कल्याणजवळील स्वस्त घरे बिल्डर्सकडून फस्त
3 खड्डे बुजविण्याच्या केवळ गप्पा..
Just Now!
X