22 September 2020

News Flash

महिलेच्या गळ्यातील दागिने लांबविले

इचलकरंजी येथे नातवाला दवाखान्यात दाखविण्यासाठी आलेल्या आजीच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी धूम स्टाईलने लंपास केले. दुपारी ही घटना घडली. याबाबतची नोंद गावभाग

| March 1, 2013 08:36 am

इचलकरंजी येथे नातवाला दवाखान्यात दाखविण्यासाठी आलेल्या आजीच्या गळ्यातील साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी धूम स्टाईलने लंपास केले. दुपारी ही घटना घडली. याबाबतची नोंद गावभाग पोलिसात झाली असून शशिकला आप्पासाहेब चौगुले (वय ४८ रा. नरंदे) यांनी फिर्याद दिली आहे.
शशिकला चौगुले या आपली मुलगी अमृता (वय २७), पती आप्पासाहेब यांच्यासह श्रीपादनगरातील डॉ. वनारसे यांच्या दवाखान्यात नातू रितेश याला दाखविण्यासाठी आल्या होत्या. दवाखान्यात डॉक्टर नसल्याने त्या बाहेर आल्या. त्याचवेळी त्यांच्यासमोरून मोटरसायकलवरून आलेल्या दोघा तरुणांपैकी मागे बसलेल्या तरुणाने चौगुले यांच्या गळ्यातील साडेचार तोळे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून मोटरसायकलवरून धूम ठोकली. चौगुले यांनी आरडाओरडा केला. पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. पोलीस दप्तरी ऐवजाची किंमत ९० हजार रुपये नोंद करण्यात आली असली तरी बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत दीड लाखाच्या आसपास होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2013 8:36 am

Web Title: snatched a mangalsutra from womans neck
टॅग Woman
Next Stories
1 पत्नीचा मृत्यू; सदोष मनुष्यवधाच्या गुन्हय़ात पतीला सात वर्षे कारावास
2 ‘विठ्ठल’ संस्थेस ग्रामीण प्रकल्पासाठी निधी
3 लाच स्वीकारणाऱ्या ग्रामसेवकास अटक
Just Now!
X