माणूस, प्राणी तसंच कला यांच्यातील परस्परसंबंधांचा वेध घेणाऱ्या ‘सोबत-संगत’ या आगळ्यावेगळ्या नाटकाचा रौप्यमहोत्सवी प्रयोग १५ मार्च रोजी दुपारी ४.३० वा. बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात सादर होणार आहे.
नातेसंबंधांतील अलवार पदर उलगडणाऱ्या चार स्वतंत्र गोष्टींचं ‘सोबत-संगत’ हे नाटक आहे. माणसांचं आपल्या आठवणींसोबतचं नातं, तर कधी सकारात्मकतेचं नकारात्मकतेशी असलेलं नातं, कधी मुक्या प्राण्याबरोबरचं अव्यक्त अन् तरीही बोलकं नातं, तर कधी कलेचं कलावंताशी असलेलं नातं.. अशा नात्यांच्या विविध रूपांचं दर्शन या नाटकात घडतं. ऐश्वर्या नारकर, संपदा जोगळेकर-कुलकर्णी आणि अविनाश नारकर नात्यांचे हे विविधांगी पदर या नाटकात रसिकांसमोर उलगडून दाखवतात. ‘सोबत-संगत’च्या २५ व्या प्रयोगानिमित्ताने नाटय़-चित्रपट-दूरचित्रवाणी क्षेत्रातील अनेक कलावंत याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत.