07 April 2020

News Flash

स्त्री भ्रूणहत्येविरोधात कीर्तनकारांनी समाजप्रबोधन करावे – ढोकमहाराज

स्त्री भ्रूणहत्येच्या वाढत्या प्रकारांमुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. समाजातील जबाबदार घटक या नात्याने प्रत्येक कीर्तनकाराने आपल्या कीर्तनातून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याबाबत प्रबोधन

| January 10, 2014 01:10 am

स्त्री भ्रूणहत्येच्या वाढत्या प्रकारांमुळे मुलांच्या तुलनेत मुलींचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. समाजातील जबाबदार घटक या नात्याने प्रत्येक कीर्तनकाराने आपल्या कीर्तनातून स्त्री भ्रूणहत्या थांबविण्याबाबत प्रबोधन करावे, असे आवाहन रामायणाचार्य रामराव ढोक महाराज यांनी केले.
झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात ढोकमहाराज यांचे कीर्तन झाले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष गौतम खटोड, सचिव सुशील खटोड, आशिष खटोड आदी उपस्थित होते. स्त्री भ्रूणहत्येला केवळ काही डॉक्टर जबाबदार नाहीत, तर इतरही घटकांनी आपली जबाबदारी ओळखली पाहिजे. पोटातील गर्भ काढायला डॉक्टर स्वत:हून कोणाच्या घरी जात नाहीत. त्यामुळे प्रत्येक माता-पित्याने असले कृत्य करताना शंभरदा विचार केला पाहिजे. टाळी कधीच एका हाताने वाजत नाही. मुलगी ही घराची प्रतिष्ठा व आई-वडिलांचा सन्मान असते. मुलगी नि वडिलांचे नाते नि:स्वार्थ गंगेसारखे निर्मळ असते. मुलीला जग पाहण्याअगोदरच संपवू नका, असे आवाहनही ढोक यांनी केले. माधव चाटे यांनी सूत्रसंचालन केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2014 1:10 am

Web Title: social awareness in kirtan of women embryo murder bid
टॅग Bid
Next Stories
1 खराब रस्त्यांची ‘देणगी’
2 परभणीत यंदाचा सर्वोच्च ५ हजार १९५ रुपये भाव
3 छेडछाडीचे प्रकार थांबविण्यास महिला पोलिसांचे दामिनी पथक
Just Now!
X